शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

आई, वडिलांसह १० वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:01 IST

दंडाचे ४० हजार रुपये मृताच्या वारस मुलाला देण्याचेही आदेश

छत्रपती संभाजीनगर : घरात घुसून कुटुंबातील आई, वडील व १० वर्षांच्या मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी आरोपी अक्षय प्रकाश जाधव (२७, रा. माळवाडी, सोलनापूर शिवार, ता. पैठण) याला तिहेरी जन्मठेपेसह ४० हजार रुपये दंड गुरुवारी (दि. ५) ठोठावला. आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम मृताच्या वारस मुलाला देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

४ वर्षांपूर्वी पैठण तालुक्यातील जुने कावसान गावातील संभाजी ऊर्फ राजू नारायण नेवारे (३५), त्यांची पत्नी आश्विनी (३०) व मुलगी सायली (१०) यांची आरोपीने हत्या केली होती. राजूचा मुलगा सोहम (६) हा या घटनेत जखमी झाला होता. राजू यांच्या पुतणीवर आरोपी एकतर्फी प्रेम करीत होता. याची माहिती राजूला मिळाली. त्यामुळे आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना दुसरीकडे राहण्यासाठी जावे लागले. आरोपीचा भाऊ अचानक बेपत्ता झाला. यामागे राजूचा हात असल्याचा संशय आरोपीला होता. राजूच्या पुतणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपी जामिनावर असताना २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्याने राजूच्या पुतणीचा पाठलाग केला. यावरून राजू व आरोपी यांच्यात वाद झाला असता ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपीने दिली होती.

२८ नोव्हेंबर २०२० च्या मध्यरात्री आरोपी तलवार, सत्तुर आणि पेट्रोलची बाटली घेऊन राजूच्या घरात शिरला, त्याने झोपेत असलेल्या राजू, त्याची पत्नी, मुलगी आणि मुलावर तलवार व सत्तुरने वार केले. सोहमला जाग आली तो ‘अक्षयदादा आम्हाला मारू नको,’ अशा विनवण्या करीत राहिला; मात्र, निर्दयी आरोपीला त्याची दया आली नाही. याबाबत मृत संभाजी यांचे भाऊ पांडुरंग यांनी फिर्याद दिली होती.

आरोपीला तिहेरी जन्मठेपखटल्याच्या सुनावणीवेळी साहाय्यक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ आणि मधुकर आहेर यांनी २६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी अक्षयला भादंवि कलम ३०२, ३०७ आणि ३२६ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये आणि आर्म ॲक्टच्या अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. ॲड. शिरसाठ यांना ॲड. तेजस्विनी मोने आणि ॲड. दिलीप खंडागळे यांनी साहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार गुणावत यांनी काम पाहिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी