तुंबळ हाणामारी; सहा गंभीर जखमी
By Admin | Updated: July 27, 2014 01:17 IST2014-07-26T23:36:41+5:302014-07-27T01:17:23+5:30
कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे म्हैस चारण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
तुंबळ हाणामारी; सहा गंभीर जखमी
कुरूंदा : वसमत तालुक्यातील खांबाळा येथे म्हैस चारण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण झाल्याने सहा जण गंभीर जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारींवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लक्ष्मण संभाजी रिठ्ठे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी बाबूराव टेकाळे, प्रभू बाबूराव टेकाळे, प्रकाश नामदेव टेकाळे (सर्व रा. खांबाळा) यांच्याविरुद्ध कलम ३२४, ४२७, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता लक्ष्मण रिठ्ठे व परसराम व्हडगीर यांच्या शेतात मारहाण झाल्याचे त्यात म्हटले आहे. रिठ्ठे यांच्या पत्नीने बालाजी टेकाळे यास ‘तुझी म्हैस आमच्या शेतातील कापसाची झाडे खात आहे. तिला बांधून का टाकत नाही?’ असे म्हटल्याने जातीवाचक शिवीगाळ करून रिठ्ठे व त्यांच्या भावास दगड व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारून गंभीर दुखापत करण्यात आली. तसेच शेतात अनधिकृतरित्या प्रवेश करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याच प्रकरणात बालाजी बाबूराव टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण संभाजी रिठ्ठे, गणेश संभाजी रिठ्ठे, बबन संभाजी रिठ्ठे (सर्व रा. खांबाळा) यांच्याविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता बालाजी टेकाळे यांना सामाईक धुऱ्यावर म्हैस चारण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारून डोके फोडण्यात आले. तसेच त्यांच्या आई पत्नीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नानासाहेब नागदरे, जमादार भुजंग कोकरे करीत आहेत. (वार्ताहर)
म्हैस चारण्यावरून वाद
वसमत तालुक्यातील खांबाळा येथे म्हैस चारण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.
यात कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण झाल्याने सहाजण गंभीर जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत लक्ष्मण संभाजी रिठ्ठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी बाबूराव टेकाळे, प्रभू बाबूराव टेकाळे, प्रकाश नामदेव टेकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणात बालाजी बाबूराव टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण संभाजी रिठ्ठे, गणेश संभाजी रिठ्ठे, बबन संभाजी रिठ्ठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
उपविभागीय अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नानासाहेब नागदरे, जमादार भुजंग कोकरे तपास करीत आहेत.