हवेत रायफलींच्या फैरी झाडून श्रद्धांजली
By Admin | Updated: October 1, 2016 01:16 IST2016-10-01T01:02:00+5:302016-10-01T01:16:14+5:30
किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली़

हवेत रायफलींच्या फैरी झाडून श्रद्धांजली
किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी ८ रायफलींच्या हवेत तीनदा फैरी झाडण्यात आल्या़ गावातील व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली़
३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावे उद्ध्वस्त झाली. यात १० हजारपेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले़ या घटनेची आठवण झाली की आजही अंगावर शहारे येतात.
शुक्रवारी जुने किल्लारी गावातील स्मृतिस्तंभास तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली़ यावेळी सरपंच युवराज गायकवाड, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, सपोनि़ डी़ बी़ वाघमोडे, प्रा़ डॉ़ संजय मोरे, प्राचार्य कापसे, डॉ़ अशोक पोतदार, मंडळ अधिकारी टी़ जे़ यादव, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष शरद भोसले, तलाठी व्यंकट पवार, प्रकाश पाटील, गणेश शिंदे, सहा़ कृषी अधिकारी कसबे, गणेश माने, ग्रामविकास अधिकारी आदमाने, दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव पाटील, तलाठी विजय उस्तुरे, किशोर भोसले, हारुण अत्तार आदी उपस्थित होते़
यावेळी आठ रायफलींच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़ या बिगुल पथकात पोहेकॉ़ माने यांच्यासह १० पोलिस कर्मचारी उपस्थित होते़ भूकंपाची ही घटना वेदनादायी असल्याने गावात हा दिवस काळ दिन म्हणून पाळला जातो़