विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने मुंडे यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: June 5, 2014 00:50 IST2014-06-05T00:21:03+5:302014-06-05T00:50:01+5:30

जालना: भाजपाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जिल्हाभरात शोक व्यक्त होत आहे.

Tribute to Munde on behalf of various parties, organizations and organizations | विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने मुंडे यांना श्रद्धांजली

विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने मुंडे यांना श्रद्धांजली

जालना: भाजपाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जिल्हाभरात शोक व्यक्त होत आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना, सेवाभावी संस्था, पदाधिकारी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्या वतीने विविध ठिकाणी बंद पाळून, शोकसभा घेऊन श्रद्धाजंली वाहण्यात आली. यात पेशवा युवा मंच मंचचे अध्यक्ष महेश जोशी, सुहास वैद्य, मयुर राखे, राहुल निघवेकर, कौस्तभ संगमुळे, अक्षय सेवलीकर, आनंद दानी, अक्षय देशमुख, पवन तळेकर, सौरभ झवर, अशोक राऊत, मयुर कुलकर्णी, सचिन पोतदार, केदार पंडीत, बालाजी पवार, विवेक लिगांयत आदींची उपस्थिती होती. संविधान पार्टी पार्टीच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. यावेळी पे्रम जाधव,निलाबाई टाकसाळ, गुंफाबाई खरात, पद्माबाई जाधव, सुंदराबाई अंभोरे, जानवी जाधव, मंदाबाई वानखेडे, गौतम जाधव, उत्तम बनसोडे, वैजिनाथ वाकळे, आकाश कांबळे, शाम कांबळे, विकास सोनवणे, विजय खरात, अरूण खरात उपस्थित होते. छायाचित्रकार संघटना शहरातील छायाचित्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शोकसभेत अध्यक्ष अनिल व्यवहारे, राजेश खर्डेकर, अतुल व्यवहारे, कैलास इघारे, नंदकिशोर शहाणे, समद शेख, शेख एक्बाल, साबेर खान, गौरव बुट्टे, शेख अनीस, नागेश बेनिवाल, राजू हटकर, गणेश पावले, मधुसूदन दंडारे, मालपाणी, गिरीश डोलारकर, णमोकार हिरप, बाळू इघारे, युनूस खान, वर्धमान हिरप उपस्थित होते. पोलिस पाटील असोसिएशन शेवगा : अंबड तालुक्यातील शेवगा पाटी येथे पोलिस पाटील संघटनेच्यावतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमास तालुकाध्यक्ष ईश्वर वाघमोरे, बाबासाहेब पांडे, जाधव उपस्थित होते. राणीउंचेगाव येथील विक्रेते, व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली. ओबीसी समाजाचा जाणता नेता गेल्याची भावना एकबाल कुरेशी यांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वाटूर फाटा : येथील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत बंदचे आवाहन केले. व्यापार्‍यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत शोक व्यक्त केला. यावेळी विक्रम माने, राधाकिशन माने, बद्रीनाथ खवणे, सुधाकर पडूळकर, बाळासाहेब अंभीरे, सिराज पठाण, माणिक आढे, बळीराम वाघमारे, शरद पडूळकर उपस्थित होते. मंठ्यात बंद मंठा: भाजपा, भाजयुमो, वरूण गांधी ब्रिगेडच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मंठा टी पॉइंट ते शिवाजी चौकापर्यंत मौन रॅली काढण्यात आली. यावेळी अशोक वायाळ, बाबुराव शहाणे, अंकुशराव अवचार, भारत बोराडे, अशोक वायाळ, पांडूरंग खराबे, संतोष दायमा, बंडु चव्हाण, सिराजखा पठाण, कय्यमु कुरेशी, राजाभाऊ बोराडे, कबीर तांबोळी, मनोज राठी, राधेशाम बियाणी, पिंटू लखोटिया, संतोष शहाणे, विष्णुपंत सराफ, दिनेश सराफ, राजेश मोरे, डॉ. नासीर पठाण आदींनी यावेळी मुंडे यांना श्रध्दांजली वाहली. यावेळी अजय अवचार, वरूण गांधी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दौलत शहाणे, नारायण दवणे, गणेश बोराडे, योगेश नाईक, नायबराव गोंडगे, शाम ढवळे, विवेक चव्हाण, संदीप अवचार, कैलास खराबे, विलास घोडके यांची उपस्थिती होती आष्टी : दिवसभर व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला. दुपारच्यानंतर भाजपाच्यावतीने शोक सभा घेण्यात आली. बहुभाषिक ब्राह्मण महासंघ जालना: केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने मराठवाड्याचा विकासपुरूष हरपला, अशा शब्दात बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. बलवंत नाईक यांनी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे सर्वपक्षाच्या वतीने शोकसभा घेण्यात आली. यावेळी सांडू पुंगळे, शिवाजी गडदे, डॉ. आत्माराम गायकवाड, सुरेश बोरसे, चंद्रकांत चोथमल, भगवान लहाने, भाऊसाहेब जाधव, लक्ष्मण काळोख, दगडूबा गोरे, समाधान कासोद, विष्णू दळवी, बाबासाहेब बोरसे, दिलीप लहाने आदी उपस्थित होते. केदारखेडा: येथील सर्व पक्षाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम स्व. मुंडे यांची प्रतिमा घेऊन गावातून मूक रॅली काढण्यात आली़ याप्रसंगी रायुकाँचे जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मनराव ठोंबरे, सरपंच गोविंद बकाल, माजी सरपंच विठ्ठल पेरे, बबनराव ठोंबरे, युवा सेना तालुका प्रमुख बालासाहेब करतारे, पंडित जाधव, उत्तमराव तांबडे, अत्माराम ठोंबरे, निळकंठ ठोंबरे, गजानन ठोंबरे, विलास मुरकूटे, ज्ञानेश्वर बकाल, बबन काळे, श्रीराम ताबंडे, संतोष वराडे, सदाशिव जुंबड, सखाराम पोपळघट, कृ ष्णाभाऊ ठोंबरे, गणपत मादणीकर,श्रीराम जाधव, भानदास ताबंडे,बाबासाहेब ठोंबरे, अकुंशराव जाधव, गणेश ताबंडे, शेनफड पवार,डिगांबर ताबंडे, बापूराव जाधव, मधुकर शेळके, एकनाथ जाधव, जगन पवार, सुखदेव जाधव, संजय ठोंबरे, शिवाजी ताबंडे, अरुण ठोंबरे, रुस्तुम सहाणे, काकासाहेब जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)चंदनझिर्‍यात उत्स्फूर्त बंद चंदनझिरा : चंदनझिरा परिसरातील सर्व व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली. मातोश्री चौकात मुंडे यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी आत्माराम लिंबोने, नगरसेवक जगन्नाथ चव्हाण, भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, शाम खरात, मधुकर बरसाले, वामनराव पवार, अशोक पारे, प्रभाकर पवार, रामेश्वर गाडेकर, लक्ष्मण खोकले, सोमनाथ गायकवाड, प्रमोद पवार, योगेश दैने, वसंत भट्ट, पुंजाराम शेळके, छगन लिंबोने, निवृत्ती दाभाडे, बाळकृष्ण जोशी, निवृत्ती भुतेकर, भागवत आहोळे, रितेश पंचारीया, दिनेश राऊत आदींची उपस्थिती होती.

Web Title: Tribute to Munde on behalf of various parties, organizations and organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.