मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
By Admin | Updated: June 4, 2014 01:33 IST2014-06-04T01:13:13+5:302014-06-04T01:33:52+5:30
जालना : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रास मोठा धक्का बसला, शोककळा पसरली.

मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जालना : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रास मोठा धक्का बसला, शोककळा पसरली. मान्यवरांनी मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. धक्कादायक घटना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली मी राजकारणात आलो. त्यांनी मला राजकारणाचे धडे शिकवले. ते माझे एक कुटुंबप्रमुख होतो. मुंडे आणि मी दिल्लीहून आज एकाच विमानाने येणार होतो. सकाळी ते म्हणाले, रावसाहेब तू विमानतळावर पोहोच, मी तेथे येतो. त्याचवेळी ही अपघाताची घटना कळाली. मला अत्यंत धक्का बसला. दु:ख सावरणे शक्य नव्हते. मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जी पोकळी निर्माण झाली, ती कधीही भरून न निघणारी आहे. भाजपासोबतच पूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसांपासून मी मुंडे यांच्याबरोबरच होतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण केंद्रापर्यंत पोहोचलो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी आणि माझे कुटुंब सहभागी आहे. - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मराठवाड्याचे दुर्देव गोपीनाथ मुंडे गेले, हे अजूनही खरं वाटत नाही. मराठवाड्यात विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे दोनच महनीय नेते होते. दोन्ही नेते गेल्याने मराठवाड्याची, महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली आहे. हानी न भरून येणारी आहे. केंद्रात ग्रामविकास खात्याचा कारभार मुंडे हे चांगल्या रीतीने सांभाळतील, असे वाटत असतानाच काळाने त्यांना नेले. राकाँच्या वतीने व माझ्या वतीने मुंडे यांना शोकपूर्ण श्रद्धांजली. - अंकुशराव टोपे, माजी खासदार लढवय्या नेता गेला महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा लढवय्या नेता गेला. अत्यंत वाईट प्रसंग आहे. सर्वस्तरातील लोकप्रिय नेता, सामान्य माणसाला आपलासा वाटणारा नेता गेल्याने मराठवाड्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. गोपिनाथ मुंडे मला नेहमी मानसपुत्र म्हणायचे. गेली २० वर्षांपासून त्यांच्याशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याविषयी बोलण्यास शब्दही अपुरे पडतील. - अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री धुरंधर नेता हरपला ४सकाळी अत्यंत दु:खद घटना घडली. महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले. धुरंदर, लढवय्या नेता गेला. मला त्यांच्याविषयी मोठा आदर होता. केंद्रात ग्रामविकास खाते मिळाल्याने त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. माझी सासरवाडी परळीची असल्याने मुंडे यांच्याशी माझे वैयक्तिकरित्या अत्यंत घनिष्ठ संबंध होते. - सुरेशकुमार जेथलिया, आमदार पक्षविरहित मैत्री निभावणारे लोकनेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने मनाला अतिशय धक्का बसला. त्यांच्या अचानक जाण्याने मराठवाड्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. ते अतिशय दिलदार व्यक्तिमत्व होते. पक्षविरहित मैत्री निभावणारे लोकनेते म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांचेबरोबर १९९९ ते २००९ या कालावधीत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे काम जवळून पाहता आले. - राजेश टोपे, पालकमंत्री बुलंद आवाज लोप पावला गोपिनाथ मुंडे यांना सर्वसामान्य जनतेच्या, शेतकर्यांच्या मागासलेल्या समाजाच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाणीव होती. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. सर्वसामान्य, तळागाळातल्या कार्यकर्त्याला ते आपला आधार वाटायचे व आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांचा संघर्ष प्रेरणादायी वाटायचा. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचा दिल्लीतील बुलंद आवाज लोप पावला. - भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, जालना अपरिमित हानी लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे यांची माझी मुंबईत भेट झाली. त्यांच्याशी हसूनखेळून चर्चा झाली. त्यांच्या अकाली निधनाने मला धक्काच बसला. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यानंतर मुंडे हे मोठे नेते. महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. - आ. चंद्रकांत दानवे, भोकरदन मराठवाड्याची मोठी हानी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने मराठवाड्यासह महाराष्ट्राची मोठी हानी झाली. ती कधीही न भरून निघणारी आहे. ते आपल्या काकांचे चागंले मित्र होते. जालन्यात केव्हाही आले तर काकांना भेटत. आपलेही त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध होते. ते आपल्यातून गेल्याचे दु:ख झाले. - आ. कैलास गोरंट्याल, जालना प्रेरणादायी नेतृत्व हरपले ४मुंडे यांच्या निधनाने कर्तबगार जिगरबाज, प्रेरणादायी नेतृत्व हरपले आहे. तळागाळातील जनतेची नाड ओळखणारे ते नेते होते. जिद्द व चिकाटीने त्यांनी आमच्यासारख्या तरूणांना दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या रुपाने मराठवाड्याच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनाने जनतेची अपरिमित हानी झाली आहे. - आ. संतोष सांबरे, बदनापूर