२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
By | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:09+5:302020-11-28T04:09:09+5:30
गुरुवारी येथील गागाभट्ट चौकात सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात शहिदांनी केलेली कामगिरी आणि बालिदानाबाबत पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक ...

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
गुरुवारी येथील गागाभट्ट चौकात सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात शहिदांनी केलेली कामगिरी आणि बालिदानाबाबत पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक छोटूसिंह गिरासे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, नानक वेदी, विष्णू ढवळे, राम आहुजा, श्याम पंजवानी, शुभम खरात यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी संविधानाचे पूजन करण्यात आले यावेळी. शहिदांना उपस्थित नागरिकांनी पुष्पमाला वाहून ‘ शहीद अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमासाठी जगन्नाथ जमादार, सुखुमल मोतियानी, रणजित करकोटक, भगवान कुलकर्णी, सिद्धार्थ परदेशी, विशाल करकोटक, गणेश शर्मा, विशाल पोहेकर, शुभम वेदी, उबेज कट्यारे, ऋषी तांबटकर उपस्थित होते.