लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली
By Admin | Updated: June 5, 2014 00:12 IST2014-06-04T23:55:48+5:302014-06-05T00:12:12+5:30
बीड: केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. या आपल्या लाडक्या लोकनेत्याला गमावल्याचे दु:ख लाखो कार्यकर्त्यांना अनावर झाले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली
बीड: केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. या आपल्या लाडक्या लोकनेत्याला गमावल्याचे दु:ख लाखो कार्यकर्त्यांना अनावर झाले. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बंद पाळून या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जिल्ह्यातील संस्था, कारखाने, संघटना आदी ठिकाणी गोपीनाथ मुंंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. होलसेल, रिटेल किराणा असो. बीड शहरातील मोंढा भागात होलसेल, रिटेल किराणा असोसिएशनच्या वतीने गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राधेश्याम अग्रवाल, मदन अग्रवाल, नीलेश लोढा, जयनारायण अग्रवाल, अमर नाईकवाडे यांच्यासह मोरया प्रतिष्ठान, जय माता दी मित्रमंडळाच्या पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपल्या भावना या नेत्याबद्दल व्यक्त केल्या. माजलगावात रॅली काढून श्रद्धांजली माजलगाव शहरामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची वार्ता समजताच येथील तरुणांनी शहरातून अभिवादन रॅली काढली. डॉ. आंबेडकर चौक, शिवाजी चौक, भाजपा कार्यालय येथे शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी ‘मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, तालुकाध्यक्ष अरुण राऊत, नगराध्यक्ष अशोक तिडके, डॉ. सुरेश साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोळंके, ज्ञानेश्वर मेंडके, तुकाराम येवले, खलील पटेल, एस. नारायण, राजेश मेंडके, नगरसेवक अमोल सोळंके, राम गायकवाड, बबनराव सोळंके, शरद कचरे, मनोज जगताप, फजलू अहेमद, अरुण अलझेंडे, शहाजी सोळंके, अशोक आळणे, शिवमूर्ती कुंभार, सतीश बोटे, लतीफ नाईक, कमल बजाज, राजश्री साळवे, ईश्वर होके, ईश्वर खुर्पे, सचिन डोंगरे, अनंत शेंडगे, अभिजीत पोटभरे, बाबा सोळंके, नितीन मुंदडा यांच्यासह सर्व पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. माजलगाव कारखाना येथील सहकारी साखर कारखान्यात केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारखान्याच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखाना संचालक मंडळ तसेच आ. प्रकाश सोळंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, कामगार, कार्यकारी संचालक, खातेप्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)