वसमत येथे आदिवासी समाजाचा मोर्चा

By Admin | Updated: August 13, 2014 00:24 IST2014-08-13T00:07:50+5:302014-08-13T00:24:36+5:30

मंगळवारी आदिवासी समाजाच्या वतीने वसमत येथे मोर्चा काढण्यात आला.

Tribal Social Front in Vasmat | वसमत येथे आदिवासी समाजाचा मोर्चा

वसमत येथे आदिवासी समाजाचा मोर्चा

वसमत : इतर कोणत्याही जातीचा वा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात येऊ नये, या मागणीसाठी मंगळवारी आदिवासी समाजाच्या वतीने वसमत येथे मोर्चा काढण्यात आला.
आरक्षण बचावच्या घोषणा देत आदिवासी समाज बांधव पारंपरिक वेशभूषेसह मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सिद्धेश्वर विद्यालयाजवळून मोर्चाला प्रारंभ झाला. आरक्षणावरील घाला सहन करणार नसल्याच्या घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांना निवेदन देण्यात आला. यावेळी डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते, काळुराम कुरूडे, कुंडलिक शेळके, सविता बळवंते, बळवंते गुरूजी, कुंताबाई कऱ्हाळे, गुहाडे, मुकाडे आदींसह आदिवासी युवक कल्याण संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tribal Social Front in Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.