शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ‘मध्य’मतदारसंघात २०१४ सारखा ‘ट्रँगल’; कट्टर शिवसैनिकांसोबत एमआयएमची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 12:15 IST

एमआयएमकडून इम्तियाज जलील नशीब आजमावतील. अजून दोघांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

-मुजीब देवणीकर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या २०१४ सारखा राजकीय ‘ट्रँगल’ आकार घेतोय. येथील राजकीय कुरुक्षेत्रात शिंदेसेनेकडून सर्वप्रथम प्रदीप जैस्वाल यांचे नाव जाहीर झाले. उद्धवसेनेकडून किशनचंद तनवाणी, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. २०१९ प्रमाणे यंदाही वंचित बहुजन आघाडी फॅक्टरही आहे. त्यामुळे येथील राजकीय लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाने विधानसभा निवडणूक लढविली. याच मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले. राजकारणातील दिग्गज मंडळींना हा निकाल बुचकळ्यात टाकणारा होता. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर या मतदारसंघात पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले. आता शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल मैदानात आहेत. उद्धवसेनेकडून पुन्हा किशनचंद तनवाणी, तसेच एमआयएमकडून इम्तियाज जलील नशीब आजमावतील. अजून दोघांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. वंचित बहुजन आघाडीने अगोदरच जावेद कुरैशी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.

२०१४ आणि २०१९ मधील मतांची टक्केवारीमध्य मतदारसंघात ३ लाख ६६ हजार ४३५ मतदार आहेत. हिंदू मतदान जवळपास ४५%, मुस्लीम मतदार ३८%, दलित समाजाचे १५.०%, इतर ३ % मतदान असल्याचा अंदाज आहे. २०१४ मध्ये इम्तियाज जलील ३२ % मतदान घेऊन निवडून आले. प्रदीप जैस्वाल २२.२,% किशनचंद तनवाणी यांनी २१.६ % मते घेतली. २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे प्रदीप जैस्वाल यांना ४२ %, एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५ % मते पडली. वंचितचे अमित भुईगळ यांनी १४ % मते घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला होता.

२०१४ मध्ये कोणाला किती मतेपक्ष-------उमेदवार-- -मिळालेली मते- -- --टक्केवारीएमआयएम- इम्तियाज जलील----६१,८४३-------३२.८शिवसेना---प्रदीप जैस्वाल----४१,८६१--------२२.२भाजप--किशनचंद तनवाणी-----४०,७७०----२१.६राष्ट्रवादी काँग्रेस- विनोद पाटील---११,८४२-----०६.३बहुजन समाज पार्टी-संजय जगताप---११,०४८----५.९मनसे---- राज वानखेडे-----६.२९१------३.३काँग्रेस----एम. एम. शेख-----९,०९३-----४.८

२०१९ मध्ये कोणाला किती मतेपक्ष---उमेदवार-----मिळालेली मते- -टक्केवारीशिवसेना- प्रदीप जैस्वाल----८२,२१७-----४२.६एमआयएम- नासेर सिद्दीकी-----६८,३२५----३५.४वंचित - अमित भुईगळ-------२७,३०२-----१४.१राष्ट्रवादी काँग्रेस- कदीर मौलाना----७,२९०----३.८

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv Senaशिवसेना