शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

शहरातील नाले तुंबले; पहिल्याच पावसात भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:44 IST

नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम

ठळक मुद्देशेतकरी बाजार संकुलाचे साईडचे शेड कोसळले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहा महिन्यांपूर्वीच झाले उद्घाटनसुदैवाने जीवितहानी नाही 

औरंगाबाद : शेतकऱ्यांना २४ तास भाजीपाला विकता यावा यासाठी जाधववाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेले शेतकरी बाजार संकुलाच्या साईडचे शेड कोसळले. वादळी वाऱ्याने समोरील व पाठीमागील बाजूला असलेले टीनचे शेड खाली कोसळले तेव्हा जोराचा आवाज झाला. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या परिसरात कोणी नव्हते, यामुळे जीवितहानी टळली.

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला अडत मार्केटमध्ये शेतकरी बाजार संकुल उभारले. ३५ हजार २३२ चौरस फूट एवढ्या जागेवर दोन मोठे डोम उभारण्यात आले. त्यांची उंची २५ फूट आहे. हे बाजार संकुल उभारण्यास अडीच कोटी रुपये खर्च आला आहे. ३ जानेवारी रोजी या संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. मात्र, तेव्हापासून शेतकरी बाजार या संकुलात भरलाच नाही. बाजार संकुलात दोन डोम तयार करण्यात आले. या डोमच्या दर्शनी बाजूला व पाठीमागील बाजूला टीनचे शेड उभारण्यात आले. रविवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे हे वरील बाजूला लावण्यात आलेले टीनचे शेड खाली कोसळले. वादळी वाऱ्याने सिमेंट काँक्रीटचे खांब उखडून शेड खाली कोसळले, तसेच पाठीमागील बाजूचेही शेड कोसळले. यामुळे बांधकामाची शंका निर्माण झाली.  

सातारा देवळाई परिसरात पावसाने नुकसानरविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मृगाच्या पावसाचे आगमन झाले; परंतु अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने अडसर निर्माण झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले.  दुपारी चार ते रात्री ९ वाजेपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर सतत नागरिकांच्या तक्रारीचे फोन खणखणत होते. सातारा, देवळाईत शासकीय व निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, रविवार असल्याने शक्यतो बहुतांश अधिकारी व कर्मचारी घरीच होते; परंतु दुपारी ४ वाजेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने परिसरात दाणादाण उडवून टाकली. 

पावसाळापूर्व कामात दिरंगाईदरवर्षी मान्सूनपूर्व धोकादायक झाडांची कटिंग करण्यात येते. पावसात स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जाते. यंदा पावसाळा सुरू झाला तरीदेखील धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यात आलेल्या नाहीत, परिणामी नागरिकांना रात्रीपर्यंत अंधारात राहावे लागले. मान्सूनपूर्व कामात दिरंगाई करण्यात आल्यानेच वीज गुल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम- महापालिकेने यंदा वेळेत मान्सूनपूर्व सफाईची कामे केली नाहीत. त्याचा परिणाम शहरात रविवारी झालेल्या केवळ ५.३ मि.मी. पावसात दिसून आला. नेहरूनगरातील ऐतिहासिक कटकटगेटसमोरील नाला तुंबल्यामुळे पुराच्या पाण्याने कटकट दरवाजालाच वेढा घातला. - नाल्याचे पाणी वाढून नजीकच्या घरात शिरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे नागरिक रस्त्यावर आले व त्यांनीच हातात बांबू घेत, तुंबलेले नाले मोकळे करून घेतले. त्यामुळे पाणी वाहून गेले. - शहरात ठिकठिकाणी अशीच अवस्था आहे. यापेक्षा अधिक पाऊस झाला तर नाल्याच्या काठावरील अनेक वासाहतीमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. - गतवर्षी नारेगावातील  वसाहतीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पुरात वाहून गेले होते. - नाला तुंबल्यानंतर पालिकेने तात्काळ जेसीबी पाठवून तेथे सफाई सुरू केली.

टॅग्स :RainपाऊसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी