रजिस्ट्री कार्यालयाची झाडाझडती
By Admin | Updated: September 11, 2014 00:36 IST2014-09-11T00:30:13+5:302014-09-11T00:36:38+5:30
जालना : येथील रजिस्ट्री कार्यालयास अतिरिक्त जिल्हाधिकारी गिरी यांनी भेट देवून तब्बल चार कार्यालयांतील प्रत्येक दस्तावऐवजाची कसून तपासणी केली.

रजिस्ट्री कार्यालयाची झाडाझडती
जालना : येथील रजिस्ट्री कार्यालयास अतिरिक्त जिल्हाधिकारी गिरी यांनी भेट देवून तब्बल चार कार्यालयांतील प्रत्येक दस्तावऐवजाची कसून तपासणी केली. अनेक दस्ताऐवजात त्रुटी आढळून आल्याने गिरी यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
अनेक महिन्यापासून रजिस्ट्री कार्यालय आणि मुद्रांक विके्रत्याबद्दल नागरिकांनी या विभागाचे जिल्हाधिकारी जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने कार्यालयात दलालाचा सुळसुळात वाढला. कोटींची नोंदणी लाखात करून देण्यात अनेक अधिकारी गुंतल्याची माहिती आहे.
नव्याने रूजू झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी गिरी यांनी शुक्रवारी अचानक रजिस्ट्री कार्यालयाला जावून चार तास ठाण मांडून सर्वच विभागाच्याा दस्तऐवजाची कसून तपासणी केली.
तब्बल चार तास चाललेल्या या तपासणीत गिरी यांना अनेक फायलीत त्रुटी आढळून आल्याने नाराजी व्यक्त करत आपण हा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी नायक यांच्या समोर ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे रजिस्ट्री कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नव्याने आलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी गिरी हे पहिलेच अधिकारी आहेत ज्यांनी रजिस्ट्री कार्यालयाची कानउघाडी केली. या झाडाझडतीने अधिकाऱ्यांचे धाबे दणावले आहे. (प्रतिनिधी)
रजिस्ट्री कार्यालयाच्या दस्ताऐवजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याचा सर्व तपशील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एल.गिरी यांनी सांगितले.