दररोज ७०० रुग्णांवर उपचार
By Admin | Updated: October 20, 2016 01:41 IST2016-10-20T01:12:38+5:302016-10-20T01:41:41+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या शहरातील ३० पेक्षा अधिक आरोग्य केंद्रांत दररोज सरासरी ७०० तर दरवर्षी अडीच लाखांहून अधिक रुग्ण येतात व त्यांच्यावर यशस्वी उपचारही केले जातात.

दररोज ७०० रुग्णांवर उपचार
महाकाळ येथे झाली होती मारहाण
वर्धा : महाकाळ या गावात करणी, जादुटोणा प्रकरणी एका इसमावर प्राणघातक हल्ला करून मारण्याचा प्रयत्न झाला तर दुसरे प्रकरण पुन्हा उद्भवले. त्यातही मारहाण होण्याची शक्यता असल्याने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्याशी संपर्क केला. महाराष्ट्र अंनिसच्या मध्यस्थीने करणी, जादुटोणाचे प्रकरण निवळले.
शंभुजी यांनी तुकाराम यांच्याशी वाद करून तुने जादुटोणा करून माझ्या मुलीला मारले, असे म्हणत मारहाण केली. यात तुकारामला डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात येऊन सध्या नागपूर येथील रुग्णालयात ते कोमात आहेत. शंभुजी याला झालेल्या मारहाणीत पायाला फ्रॅक्चर झाले.
या घटनेला १५ ते २० दिवस होत नाही तोच पुन्हा एक प्रकरण उद्भवले. यात श्यामराव हा आदिवासी समाजातील गरीब म्हातारा बकऱ्या चारण्याचे काम करतो तर पांडुरंग यांचा नातू जो महाकाळ येथेच राहतो. तो १२ वर्षाचा आहे. त्याला ताप येत होता. यात तो काही तरी बडबडायचा. त्याने श्यामरावचे नाव घेतले, असे सांगण्यात आले. कुण्या बाबाकडे (तांत्रिककडे) श्यामरावचे नाव निघाले. पांडुरंगजीने सर्व उपचार, तपासण्या करून पाहिल्या; पण आराम पडत नव्हता. यामुळे संशय अधिक बळकट होऊन श्यामरावचे नाव गावात सांगण्याची तोंडा-तोंडी माहिती होत गेली.
यामुळे गावकऱ्यांना १५ ते २० दिवसांपूर्वीचा प्रसंगा आठवला. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्यवाह प्रा. अजय सावरकर यांची शेती महाकाळला असल्याने त्यांना ही बाब कळली. त्यांनी लगेच दोन्ही प्रकरणे गजेंद्र सुरकार यांना कळविले. प्रकरणाची गंभीरता पाहून सरपंच आशा महाकाळकर, पं.स. सदस्य पुरूषोत्तम टोणपे, पोलीस पाटील सविता धोटे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय माजरखेडे, दोन्ही वादी प्रतिवादी, प्रतिष्ठित नागरिक, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुका कार्यवाह सुनील ढाले, कार्यकर्ते भीमसेन गोटे, तालुका कार्याध्यक्ष विजय कडू, अजय मोहोड यांच्यासह बैठक घेऊन वादी-प्रतिवादी यांना माणसशास्त्र, घडणाऱ्या घटना, उपचार पद्धती, जादुटोणा विरोधी कायदा, जादुटोणा, करणी अस्तित्वात नसल्याचे शास्त्रीय पुरावे गावातील संबंध, जादुटोणा करणीच्या संशयातून होणारी हत्या, न्यायालयातील घटनाक्रम आदीबाबत माहिती दिली. करणी, जादुटोणाचे अस्तित्व नाहीच, हे पटवून दिल्याने समझोता घडून आला. सामंजस्याने वागण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)