डॉक्टरांच्या गैरहजेरीत शिपाईच करतात जनावरांवर उपचार

By Admin | Updated: July 9, 2014 00:26 IST2014-07-08T22:39:29+5:302014-07-09T00:26:46+5:30

चिंचोलीमाळी: येथील पशुवैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर रहात असल्याने येथे येणाऱ्या पशुवंर शिपायालाच उपचार करावे लागत आहेत.

Treating the animals in the absence of doctors | डॉक्टरांच्या गैरहजेरीत शिपाईच करतात जनावरांवर उपचार

डॉक्टरांच्या गैरहजेरीत शिपाईच करतात जनावरांवर उपचार

चिंचोलीमाळी: येथील पशुवैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर रहात असल्याने येथे येणाऱ्या पशुवंर शिपायालाच उपचार करावे लागत आहेत. अनेकवेळा शिपाईही येथे हजर नसतो, त्यामुळे उपचारासाठी जनावरे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर खाजगी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत आहे. याचा त्रास मात्र जनावरांना सहन करावा लागत आहे.
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे जि.प.पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय श्रेणी एकचा दवाखाना आहे. या पशुवैद्यकीय रूग्णालयात चिंचोलीमाळी सह वरगाव, हादगाव, केवड, सारूकवाडी, डोका, खोदला, भोपला आदी गावातील शेतकरी आपल्या जनावरांना घेऊन उपचारासाठी येत असतात. मात्र येथे आल्यानंतर वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने त्यांना आपल्या पशुधनावर शिपायाकडूनच उपचार करुन घ्यावे लागत आहेत. हे डॉक्टर गावोगावी जाऊन पशुधनावर उपचारही करीत नाहीत. अनेकदा गंभीर आजार असल्यानंतर शेतकरी आपल्या पशुधनाला खाजगी दवाखान्यात घेऊन जात आहेत. त्यामुळे याचा आर्थिक भुर्दंडही सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी कराड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो न झाल्याने त्यांची बाजू कळाली नाही. (वार्ताहर)
जनावरांचे हाल
येथील डॉक्टर नेहमीच असतात गैरहजर
डॉक्टरचा कारभार पाहतो शिपाई आणि क्लार्क
कारवाई करण्याची होतेय मागणी

Web Title: Treating the animals in the absence of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.