प्रवासी महिलेचे गंठण लंपास
By Admin | Updated: September 1, 2016 01:11 IST2016-09-01T00:52:58+5:302016-09-01T01:11:11+5:30
परंडा : शहरातील बसस्थानकात सोनारी गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, चोरट्यांनी

प्रवासी महिलेचे गंठण लंपास
परंडा : शहरातील बसस्थानकात सोनारी गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, चोरट्यांनी पर्समधील एक लाखाचे गंठण व रोख १५०० रूपये असा मुद्देमाल लंपास केला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील संगिता पवार ही महिला सोनारी (ता़परंडा) येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाली होती़ संगिता पवार या बुधवारी दुपारी परंडा बसस्थानकात आल्या होत्या़ त्यावेळी बसस्थानकात सोनारी मार्गे जाणारी उस्मानाबाद- अनाळा- खर्डा ही बस लागली़ संगिता पवार या बसमध्ये चढत असताना त्यांच्याकडील पर्समधील पॉकेट चोरट्यांनी हातोहात लंपास केले़ पॉकेटातील एक लाख ५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण व रोख १५०० रूपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ यामुळे एकच खळबळ उडाली आहे़ संगिता पवार या बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला़ त्यांनी आरडाओरड केली मात्र, चोरटे तोपर्यंत पसार झाले. (वार्ताहर)