मध्यवर्ती स्थानकात एसटीचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास...!

By Admin | Updated: September 4, 2014 00:51 IST2014-09-04T00:24:40+5:302014-09-04T00:51:33+5:30

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

Traveling through a steep pavement road in central station ...! | मध्यवर्ती स्थानकात एसटीचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास...!

मध्यवर्ती स्थानकात एसटीचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास...!

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु डांबरीकरण होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी होत नाही तोच आवारातील रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज विविध मार्गांवरील हजारो बस ये-जा करतात. गेल्या काही दिवसांपासून स्थानकाच्या आवारात खड्डे पडले आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते, त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करताना आणि बसस्थानकातून बाहेर पडताना खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अशा खड्ड्यांमधून सातत्याने ये-जा केल्यामुळे गाड्यांचे विविध पार्ट खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यात बसस्थानक आवारातील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले होते, त्यामुळे बसस्थानकातून ये-जा करताना प्रवाशांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास काही दिवस थांबला; परंतु अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत पुन्हा खड्ड्यांच्या त्रासाला प्रवाशांसह एसटी चालकांना सामोरे जावे लागत आहे.
या विदारक परिस्थितीमुळे ऐतिहासीक शहराचे नाव धुळीस मिळत आहे.

Web Title: Traveling through a steep pavement road in central station ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.