शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, गोपनीय कागदपत्रांचा ताबा; तो 'एजंट' पैठणचा प्रतितहसीलदारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:39 IST

लाचेची पहिली रक्कम ऑनलाइन स्वीकारली, पैशांसोबत लाच म्हणून वाळूचीही मागणी

छत्रपती संभाजीनगर : कागदोपत्री शेतकरी असलेला सलील करीम शेख (रा. लक्ष्मीनगर, पैठण) याचा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यासारखाच तहसील कार्यालयात वावर होता. नेहमी तहसीलदारांच्या गाडीतून प्रवास, तहसीलची सर्व गोपनीय कागदपत्रे, आदेशांचाही ताबा त्याच्याकडे असायचा. त्यामुळे प्रत्यक्षात एजंट असलेला सलील पैठणचा 'प्रतितहसीलदार’च होता. सोमवारी लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर तहसील कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतचे त्याचे घनिष्ठ संबंध, त्याच्याकडे असलेल्या शासकीय कागदपत्रांचे पुरावेच उघडकीस आले.

वाळू व्यावसायिकाचे जप्त वाहन सोडण्यासाठी ५० हजार रुपये स्वीकारून १ लाख २० हजारांची लाच सलीलने तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या नावे मागितली होती. व्यावसायिकाने १७ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर एसीबीकडे तक्रार केली. १८ फेब्रुवारीपासून तब्बल सहा वेळा सापळा रचण्यात आला. २४ फेब्रुवारी रोजी चव्हाण यांनी पैसे घेतले नाहीत. सोमवारी तक्रारदाराच्या गावातच सलील ५०० रुपयांच्या २२० नोटा म्हणजेच १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला.

सोळा तास खासगी लॉजवर चौकशीसोमवारी दुपारी ३:४९ ते ४:५२ पर्यंत कारवाईनंतर सलीलला ताब्यात घेत पैठणच्या लॉजवर नेले. चव्हाणलाही ताब्यात घेत लॉजवर नेले. तब्बल १६ तास दोघे लॉजवर एसीबीच्या ताब्यात होते. मंगळवारी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल केला गेला. दुपारी दोन वाजता दोघांच्या अटकेची नोंद केली. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या हवाली केले. कारवाईत इतका विलंब का झाला, यावरूनही अहिल्यानगर एसीबीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उपअधीक्षक संगीता पाटील अधिक तपास करत आहेत.

लाच म्हणून वाळूची मागणीचव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत सहायक हरीश शिंदे हा या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. त्याने तक्रारदाराला स्वतंत्र ३० हजार रुपयांसह लाच म्हणून घरी दोन हायवा वाळू टाकण्याची अट घातली होती. दोघे अडकल्याचे कळताच शिंदे पसार झाला.

व्हॉटस्ॲपवर पत्रसलीलच्या व्हॉटस्ॲप तपासणीत चव्हाण यांच्यासोबत कार्यालयीन पत्रव्यवहाराची देवाणघेवाण केल्याची बाब आढळली. त्याच्या खासगी वाहनात तहसीलच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे गठ्ठे असल्याची धक्कादायक बाब उघड आली. अनेदा तो रात्री उशिरापर्यंत 'साहेबां’च्या घरी जाऊन गोपनीय फाइल्सवर सह्या घेई.

टॅग्स :sandवाळूAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर