विभागीय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: June 3, 2016 23:45 IST2016-06-03T23:37:57+5:302016-06-03T23:45:56+5:30
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होताच विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होताच विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने बदल्या करताना काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर मेहरबानी केली आहे. मुख्यालयात सहा वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश झाला नसल्याची ओरड कर्मचारी संघटना करीत आहेत. विभागीय प्रशासनाने १४ अव्वल कारकून, ६ लिपिक, २ शिपाई, अशा २१ जणांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील संघटनेने बदल्यांप्रकरणी आवाज उठविण्याचा प्रयत्न करताच जिल्हाधिकाऱ्यांनी २ जून रोजी बदली करण्यात आलेल्या नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी १ दिवसांत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश काढले. त्यामुळे संघटनांचे आणखी पित्त खवळले आहे. सर्वांसाठी समान न्याय या भूमिकेने प्रशासनाने बदल्या करणे गरजेचे होते; परंतु प्रशासनाने तसे न करता बदल्या केल्याचा आरोप संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. प्रशासकीय कारणांवरून बदल्या केल्या आहेत. परंतु बदल्यांमुळे अनेकांची बसलेली घडी विस्कटली आहे.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या बदल्यांमध्ये तालुकानिहाय कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तर विभागीय प्रशासनाने जिल्हावार बदल्या केल्या आहेत.