शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'नकोसे' असलेल्या अधिकाऱ्यांच्या मनपात बदल्या; मर्जीतील कर्मचाऱ्यांना ‘मलईदार’ टेबलवर वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:45 IST

एक महिन्यापासून या बदल्यांची फाइल फिरत होती. शेवटी प्रशासनाने निर्णय घेतला.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. काही विभागांत नकोसे असलेल्या अधिकाऱ्यांची थेट उचलबांगडी करण्यात आली. मर्जीतील अधिकाऱ्यांची ‘मलईदार’ टेबलवर वर्णी लावण्यात आली. एक महिन्यापासून या बदल्यांची फाइल फिरत होती. शेवटी प्रशासनाने निर्णय घेतला. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.

शुक्रवारच्या तारखेत काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशांत दक्षता विभागाचे उपअभियंता गोविंद पाटे यांच्याकडे गुंठेवारी कक्षाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे दक्षता कक्ष, कत्तलखान्यासह इतर विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे यांची प्रभाग आठमध्ये बदली केली. कनिष्ठ अभियंता पूजा भोगे यांची प्रभाग सातमध्ये उपअभियंता म्हणून, अभियांत्रिकी सहायक बळीराम बोंबले यांची नगर रचना विभागातून मालमत्ता विभागात बदली केली. उपअभियंता देवेंद्र टेंगळे यांची प्रकल्प विभागातून बीओटी विभागात, सहायक अभियंता आरती नवगिरे यांची घरकुल आवास योजनेतून घरकुल विभागात प्रभारी उपअभियंता म्हणून, कंत्राटी अभियंता गंगाधर भांगे यांच्याकडे गुंठेवारीसाठी प्रभाग १ ते १० प्रभागांची माेठी जबाबदारी सोपविली. कनिष्ठ अभियंता किरण तमनर यांची पाणीपुरवठा विभागातून प्रभाग नऊमध्ये उपअभियंता म्हणून, कनिष्ठ अभियंता रामेश्वर सुरासे यांची अतिक्रमण हटाव विभागातून नगररचना विभागात, सोमशंकर म्हेत्रे यांची प्रभाग दोनमधून पाणीपुरवठा विभागात, अतिष पाटील यांची उद्यान विभागात बदली केली.

ठोकळ यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारीसातारा-देवळाई येथील वादग्रस्त कार्यालय प्रकरणातील वरिष्ठ लिपिक कृष्णा ठोकळ यांच्याकडे पूर्वी आठ व दहा या प्रभागांची जबाबदारी होती. आता ७ व ८ ची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता काझी जावेद अहमद यांची ड्रेनेज विभागातून प्रभाग १, २ मध्ये, लिपिक शेख असिफ यांची प्रभाग ३, ४, कनिष्ठ अभियंता भरत देवकर यांची प्रभाग ५,६, अनुरेखक विनोद पवार यांची प्रभाग १० मध्ये बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका