शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

छत्रपती संभाजीनगरमधील सात पोलीस निरीक्षकांच्या विदर्भात बदल्या

By बापू सोळुंके | Published: January 31, 2024 5:30 AM

Police Transfer : चार वर्षापासून शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सात पोलीस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री  विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे  बदल्या करण्यात आल्या.

- बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर - चार वर्षापासून शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या सात पोलीस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री  विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि अमरावती येथे  बदल्या करण्यात आल्या. यात पाच निरीक्षकांची बदली नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात झाली आहे.

राज्यातील विविध ठिकाणाहून पाच पोलीस निरीक्षक शहरात बदलून आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात बदलीचे ठिकाण. क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील (नागपूर शहर), छावणी वाहतूक शाखेच्या निरीक्षक राजश्री आडे (नागपूर शहर), हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार (नागपूर शहर), वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलाश देशमाने (नागपूर शहर), विशेष शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे (नागपूर शहर), दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगरकर (गडचिरोली), पोलीस नियंत्रण कक्षातील निरीक्षक हनुमंत गिरमे (अमरावती शहर) या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

हे चार पोलीस निरीक्षक शहरातपोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे व पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, (नागपूर शहर पोलीस आयुक्तालय), पोलीस निरीक्षक अनिल देवढे (पिंपरी चिंचवड), रेखा लोंढे (अमरावती) आणि कुमारसिंग राठोड हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातून बदलून येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली