२०० कर्मचाऱ्यांनी घेतले सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 00:27 IST2015-05-25T00:09:27+5:302015-05-25T00:27:20+5:30
लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सेवार्थ प्रणाली अंतर्गत आॅनलाईन वेतन अदा केले जाणार आहे़ त्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शुक्रवार व शनिवार असे दोन

२०० कर्मचाऱ्यांनी घेतले सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण
लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सेवार्थ प्रणाली अंतर्गत आॅनलाईन वेतन अदा केले जाणार आहे़ त्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस मुंबई येथील प्रशिक्षक सचिन कुलकर्णी यांनी सेवार्थ प्रणालीचे आॅनलाईन प्रशिक्षण दिले़
लातूर जिल्हा परिषदेतील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन सेवार्थ प्रणालीअंतर्गत करण्यात येत आहे़ सेवार्थ प्रणाली अंतर्गत संगणक प्रणाली, नेटवर्किंग वेतनाशी संबंधित असणारी माहिती अपलोड करणे, या सर्व बाबी कर्मचाऱ्यांना नवीन असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आले़ काही विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती अपलोड करता येत नसल्याने तर काही विभागात योग्य व अचूक माहिती नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनाने एका खाजगी कंपनीच्या प्रशिक्षित तज्ज्ञांकडून जिल्ह्यातील दहा तालुक्यातील वेतनाशी संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात सकाळी १० ते ५ या वेळेत आॅनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. वेतनाची माहिती अपलोड करताना येत असलेल्या अडचणींची माहिती सह प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले़ शुक्रवारी पाच तालुक्यातील सदस्यांना प्रशिक्षण दिले़ तर शनिवारी पाच तालुक्यातील अशा दहा तालुक्यातील प्रशिक्षण देण्यात आले़ (प्रतिनिधी)