इको फे्रंडली मूर्तींसाठी आजपासून प्रशिक्षण
By Admin | Updated: August 29, 2016 00:53 IST2016-08-29T00:28:56+5:302016-08-29T00:53:29+5:30
जालना : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्याने होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूह आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या

इको फे्रंडली मूर्तींसाठी आजपासून प्रशिक्षण
जालना : प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्याने होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूह आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मैत्र मांदियाळी संस्थेच्या वतीने संयुक्त उपक्रम राबविण्यात येत असून, शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शाळांमध्ये दिले जात आहे. याला शाळांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी म.सा. जैन विद्यालय आणि राष्ट्रीय हिंदी विद्यालयात हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी तसेच होणार ऱ्हास थांबविण्याच्या उद्देशाने लोकमतने पुढाकार घेतला असून, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती वापरु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मैत्र मांदियाळी आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी १०.३० वाजता जैन विद्यालयात, तर दुपारी ३.३० वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालयात औरंगाबाद येथील प्रशिक्षित व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यासह शाडूच्या मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. सोमवारपासून या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर संपूर्ण आठवडाभर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल.
शाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना करावयाची आहे. याद्वारे कुटुंबासह नातेवाईकांतही पर्यावरण बचावचा संदेश जाईल. शाळांनी उपक्रमात सहभागी होण्यासाठी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे (९५९४०८५५०६) व मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे (९४२२२२७५७९) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)