प्रशिक्षणापासून आरेखक वंचितच !

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:27:07+5:302014-07-25T00:28:18+5:30

संजय तिपाले , बीड अनुरेखक पद गोठविल्यानंतर आरेखकवर्गीय कर्मचाऱ्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. बदलत्या काळानुरुप त्यांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देखील उपलब्ध करुन दिले नाही.

From the training the drawer deprived! | प्रशिक्षणापासून आरेखक वंचितच !

प्रशिक्षणापासून आरेखक वंचितच !

संजय तिपाले , बीड
अनुरेखक पद गोठविल्यानंतर आरेखकवर्गीय कर्मचाऱ्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. बदलत्या काळानुरुप त्यांना प्रशिक्षण, अद्ययावत साहित्य देखील उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे आरेखकांच्या कुशलतेला वावच मिळाला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
अनुरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात समावेश करण्याचा शासानादेश आला; पण बीडमध्ये अजूनही काही कर्मचारी अनुरेखक पदावरच कार्यरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त नसल्याने त्यांचा या संवर्गातील समावेश रखडला आहे. दरम्यान, अनुरेखक पद गोठल्यानंतर आरेखक व कनिष्ठ आरेखक यांना बदलत्या काळानुसार तांत्रिक प्रशिक्षण देणे गरजेचे होते. शिवाय त्यांना अद्यावत उपकरणेही उपलब्ध करणे आवश्यक होते.
शासनाने त्यांना प्रशिक्षण तर दूरच; पण उपकरणे देखील दिली नाहीत. उपकरणांसाठी शासनाकडे पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने तोकड्या साहित्यावरच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना त्यांची कुशलता व क्षमता विकसित करण्याची संधीच मिळाली नाही.
कामाचा बोजा !
आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना ‘जॉबचार्ट’ प्रमाणे ३१ प्रकारची कामे करावी लागतात. नकाशाचा पुरवठा, गोपनीय पत्रव्यवहार, वार्षिक अहवाल, रस्त्यांची नोंद निर्देशिका, पुलांची नोंद निर्देशिका, इमारतींची नोंद निर्देशिका, तपासणी टिपणी, रस्त्यांचे स्थानदर्शक नकाशे, नकाशे अद्यावत करणे, खडीचे दरपत्रक ठेवणे, मान्सूनपूर्व तसेच मान्सूननंतर तपासणी बांधकाम नोंदी निर्देशिका अद्यावत ठेवणे, रोडचार्ट अ, ब अद्यावत करणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समिती स्तरावर इतर कामेही आरेखकांवर ढकलली जातात. त्यामुळे मूळ कामे प्रलंबित राहतात.
प्रशिक्षण महत्त्वाचे
राज्य जिल्हा परिषद रेखाचित्र संवर्ग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सय्यद एम. एल. यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आरेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांना यशदाकडून अद्ययावत तांत्रिक प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. संगणक अर्हता, संगणक पुरवठा, उपकरणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामकाजात अडचणी येतात. कामात अचूकता व गती आणण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित हवेत असे सांगून आरेखकांना जॉबकार्डप्रमाणेच कामे द्यावीत, इतर कामांचा बोजा नको असेही सय्यद म्हणाले.

Web Title: From the training the drawer deprived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.