शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:09 IST

तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला.

औरंगाबाद : तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. हे प्रशिक्षण मुंबईतील भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सांभाळलेली आहे. त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर, सिडको, छावणी आणि वाळूज या चार डिव्हिजनअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक कार्यरत असून, सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम करीत आहेत.

वाहतूक विभागात सुमारे २५० पोलीस कर्मचारी आहेत. या सर्व वाहतूक पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांना मूलभूत वाहतूक नियमन कसे करावे, वाहतूक नियमनासंदर्भात नव्याने आलेल्या आधुनिक उपकरणाचा वापर कसा करावा, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, स्पीड गण यासह अन्य उपकरणे कशी हाताळावीत, वाहनचालकांसोबतचे होणारे वाद टाळण्यासाठी कसे संभाषण करावे, यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान वाहतूक पोलिसांना भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. येथील कर्मचार्‍यांपैकी प्रत्येकी ५० कर्मचार्‍यांच्या पाच बॅच एकानंतर एक भायखळा येथे पाठविण्यात येणार आहेत. ५० कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर कर्मचार्‍यांचा निर्माण होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी मुख्यालयातील कर्मचार्‍यांची मदत घेतली जाईल, असे डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMilind Bharambeमिलिंद भारंबे