रेल्वेच्या धडकेने मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: December 11, 2014 00:47 IST2014-12-11T00:18:30+5:302014-12-11T00:47:14+5:30
औरंगाबाद : पटरी ओलांडत असताना रेल्वेची धडक लागल्यामुळे एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी पडेगाव परिसरातील तारांगणजवळ घडली.

रेल्वेच्या धडकेने मजुराचा मृत्यू
औरंगाबाद : पटरी ओलांडत असताना रेल्वेची धडक लागल्यामुळे एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी पडेगाव परिसरातील तारांगणजवळ घडली.
बाळासाहेब रामचंद्र चेडे (३८, रा. पडेगाव) असे त्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चेडे हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास मजुरीसाठी साईटवर जात होते. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची त्यांना धडक लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चेडे यांना उपचारासाठी घाटीत आणले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याची छावणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.