रेल्वे सुटली अन् दोन मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:42+5:302021-01-08T04:11:42+5:30
औरंगाबाद : अमृतसर - नांदेड सचखंड एक्स्प्रेसने ललितपूर ते भोपाळ असा प्रवास करताना पाणी घेण्यासाठी उतरलेले वडील झाशी रेल्वे ...

रेल्वे सुटली अन् दोन मुले
औरंगाबाद : अमृतसर - नांदेड सचखंड एक्स्प्रेसने ललितपूर ते भोपाळ असा प्रवास करताना पाणी घेण्यासाठी उतरलेले वडील झाशी रेल्वे स्टेशनवरच राहिले. कारण सुटलेली रेल्वे त्यांना पकडता आली नाही. त्यावेळी झोपेत असलेली त्यांची ८ आणि ५ वर्षीय दोन्ही मुले गुरुवारी थेट औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचली. रेल्वेत प्रमोदकुमार यांनी मुलांची आस्तेवाईकपणे चौकशी करून या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनला रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना उतरून घेतले.
दोन्ही मुलांचे वडील बसने इंदूर येथून शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचणार असून, त्यानंतर त्यांची व मुलांची भेट होणार आहे. दोन्ही भावंडांना बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. यासाठी रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा, के. चंदूलाल, यू. आर. डोभाळ, महिला कर्मचारी गुड्डी कुमारी, दानिश कुमारी, रेल्वे पोलीस अमर चौधरी यांनी प्रयत्न केले.