टाकळी येथे दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: August 20, 2015 00:45 IST2015-08-20T00:42:52+5:302015-08-20T00:45:45+5:30
परंडा : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील टाकळी येथे मंगळवारी रात्री घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर बार्शी येथे उपचार सुरू आहेत.

टाकळी येथे दोन गटांत हाणामारी
परंडा : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील टाकळी येथे मंगळवारी रात्री घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर बार्शी येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी टाकळी गावात चोरीची अफवा पसरल्यामुळे गावातील दत्तात्रय भाऊसाहेब काळे, मारूती ठाणेकर व वसंत ठाणेकर हे दत्तात्रय काळे यांच्या शेतात राखण करीत बसले होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परमेश्वर काळे, रामेश्वर काळे, शंकर काळे, कानिफनाथ काळे, सतीश काळे, कुणाल काळे, सोमनाथ काळे हे लोक तेथे आले. यावेळी परमेश्वर संदीपान काळे याने दत्तात्रय काळे यांना ‘तू मनोज काळे (माजी सरपंच) याच्यासोबत का फिरतो’, अशी विचारणा करीत पाठिवर व पायावर काठीने मारहाण केली. तसेच उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. रामेश्वर काळे व इतरांनी मारूती ठाणेकर, वसंत ठाणेकर यांच्या नाकावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याच प्रकरणात रामेश्वर काळे यांनीही फिर्याद दिली आहे. यात त्यांनी नरहरी तुकाराम काळे यांच्याशेतातील आडाजवळ मनोज काळे, बालाजी काळे, महादेव काळे, मारूती ठाणेकर, वसंत ठाणेकर, दादासाहेब काळे व महावीर डोके यांनी तुकाराम काळे यांचे वडील परमेश्वर काळे यांना अडवून मारहाण केली. त्याांनी तोंडावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याने यात त्यांचे ओढ फाटले. तसेच दोन दातही परले. परमेश्वर काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रामेश्वर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना व्ही. एल. जानराव व सोनि साबळे करीत आहेत. (वार्ताहर)