उद्योजक देटे यांचे अपघाती निधन
By Admin | Updated: March 5, 2015 00:01 IST2015-03-04T23:57:46+5:302015-03-05T00:01:42+5:30
कळंब : ईटकूर येथील रहिवाशी व औरंगाबाद येथील तरुण उद्योजक प्रमोद शिवाजी देटे यांचे मंगळवारी रात्री अपघाती निधन झाले. देटे यांनी औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत

उद्योजक देटे यांचे अपघाती निधन
कळंब : ईटकूर येथील रहिवाशी व औरंगाबाद येथील तरुण उद्योजक प्रमोद शिवाजी देटे यांचे मंगळवारी रात्री अपघाती निधन झाले. देटे यांनी औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत गाड्यांच्या क्लसचे पार्ट तयार करण्याचा स्वत:चा उद्योग सुरु केला होता. त्यांच्यावर बुधवारी ईटकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईटकूर येथील प्रमोद शिवाजी देटे (वय ४०) हे प्रारंभी औरंगाबाद येथील एका कंपनीत नोकरीस होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी तेथील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये स्वत:चा उद्योग सुरू केला. मंगळवारी कामकाज पाहून आपल्या गारखेडा परिसरातील घराकडे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यात देटे यांच्यासह इतर दोन सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला. एका कंपनीतील कामगार ते अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देणारा उद्योजक अशी प्रगती साधलेल्या देटे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मूळ गावी ईटकूर येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)