वयोवृद्धांच्या मदतीला धावले वाहतूक पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:38 IST2017-08-02T00:38:26+5:302017-08-02T00:38:26+5:30
जालना रोडवर एक वृद्ध चालताना भोवळ येऊन पडले, तर एकाला वाहनाची धडक लागली. त्यांना मदत कोणी करेना. गर्दी जमल्याची माहिती वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना मिळाली अन् ते धावून आले.

वयोवृद्धांच्या मदतीला धावले वाहतूक पोलीस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जालना रोडवर एक वृद्ध चालताना भोवळ येऊन पडले, तर एकाला वाहनाची धडक लागली. त्यांना मदत कोणी करेना. गर्दी जमल्याची माहिती वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना मिळाली अन् ते धावून आले.
वसंत गोसावी यांना मंगळवारी सायंकाळी चालताना भोवळ आल्याने ते खाली पडूत बेशुद्ध झाले, तर बाबासाहेब बोर्डे या वृद्धाला दुचाकीने धक्का दिल्याने तेही रस्त्यावर पडले. दोन्ही घटना जवळपास अंतरावर जालना रोडवर झाल्या. पो. कॉ. गणेश जोगदंड, सहायक फौजदार सय्यद यांनी दोन्ही जखमींना नागरिकांच्या मदतीने रिक्षात बसवून खाजगी दवाखान्यात दाखल केले.