बसमधून नियमबाह्य प्रवाशी वाहतूक !
By Admin | Updated: May 13, 2015 00:28 IST2015-05-13T00:06:20+5:302015-05-13T00:28:10+5:30
बीड : केवळ खाजगी वाहनांतूनच नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात नसून एसटी मंहामंडळाच्या बस गाड्यांमधूनही नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे

बसमधून नियमबाह्य प्रवाशी वाहतूक !
बीड : केवळ खाजगी वाहनांतूनच नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात नसून एसटी मंहामंडळाच्या बस गाड्यांमधूनही नियमबाह्य प्रवाशी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असून अद्यापपर्यंत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. ही प्रवाशी वाहतूक सुद्धा बसच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे.
सोयी-सुविधा देण्याऐवजी तिकीटात वाढ केली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
क्षमता ५७ प्रवाशांची अन्....
२७२ च्या बसगाड्यांमध्ये ४४ प्रवाशी, चालक-वाहक असे दोन व ११ उभे प्रवाशी असे एकूण ५७ प्रवाशांची क्षमता नियमानुसार आहे. मात्र महामंडळाच्यसा बसमध्ये ६० ते ७० प्रवाशी असल्याचे सर्रास दिसून येते. ही नियमबाह्य प्रवाशी वाहतूक खाजगी वाहनांवर कारवाया करणाऱ्या पोलिसांना व महामंडळातील अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा सवाल आता उपस्थित केला.
कर्मचारीही अपुरेच
यांत्रीक व वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेकवेळा ओव्हरटाईम करावा लागतो. आराम न मिळाल्याने मग अपघातासारख्या घटना घडतात.
सिनीअर्सला जवळची ड्यूटी
ज्या चालक, वाहकांचे वय जास्त आहे, अशांना जवळची ड्यूटी दिली जाते. अनेकांना मागणीनुसारही ड्यूटी दिली जाते. वयानुसार ड्यूटी देण्याचा कुठलाही नियम नसल्याचे आगारप्रमुख ए.एस.भुसारी यांनी सांगितले.
बसगाड्यांच्या दुरूस्तीसाठी विभागीय कार्यशाळेतून साहित्य मिळत नसल्याने कामे रखडतात.अनेकवेळा अॅडजेसमेंट करून साहित्य बसविले जाते. यांत्रीक विभागातील अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)