कोर्टालगत रस्त्यावर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:18+5:302020-12-17T04:32:18+5:30
औरंगाबाद : हायकोर्टालगतच्या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. सिग्नलपासून कोर्टाच्या प्रवेशद्वारापर्यंत टाकलेल्या दुभाजकामुळे वाहतुकीला रोज अडथळा होत आहे. राँगसाइड ...

कोर्टालगत रस्त्यावर वाहतूक कोंडी
औरंगाबाद : हायकोर्टालगतच्या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. सिग्नलपासून कोर्टाच्या प्रवेशद्वारापर्यंत टाकलेल्या दुभाजकामुळे वाहतुकीला रोज अडथळा होत आहे. राँगसाइड वाहने, अरुंद रस्ता, लावलेले बॅरिकेेेडस् यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.
रस्त्यांवरील धुळीचा त्रास
औरंगाबाद : शहरातील बहुतांश रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य आहे. मनपाने दुभाजक स्वच्छ करून गोळा केलेली माती हवेसोबत उडत असल्यामुळे धूळ वाढत आहे. यामुळे नागरिकांना डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता बळावली आहे.
सूतगिरणी रस्त्याचे काम लवकर करा
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौक ते एकता चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. मनपा ते काम सिमेंट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करीत असून, ते काम लवकर करण्याची मागणी नागरिक, व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.
ग्रीन बेल्टमध्ये कचऱ्याचा ढीग
औरंगाबाद : सिडको परिसरातून जालना रोडकडे जाताना समोरील बाजूच्या ग्रीनबेल्टमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तेथे कचरा टाकण्यास मनपाच्या यंत्रणेने विरोध करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर परिसरातील अनेक वॉर्डांमधील अंतर्गत पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक मनपाकडे तक्रार करीत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे ते लक्ष देत नाहीत, तर अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी पथदिव्यांसाठी तक्रारी करूनही कुणी दाद देत नसल्याचे दिसत आहे.
अग्रसेन चौकातील रोड खड्ड्यात
औरंगाबाद : जालना रोडवरील अग्रसेन चौकापासून जीएसटी कार्यालयाकडे जाणारा रस्ता पूर्णत: उखडला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एन-५ कडे जाताना वाहनचालकाला तारेवरची कसरत करून जावे लागते आहे. सदरील रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दुभाजकाचे काम अर्धवट
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगरपर्यंत रस्ता सौंदर्यीकरणासाठी करण्यात येणारे दुभाजकाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. ते काम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आतापर्यंत ३० लाख रुपयांचा खर्च यावर झाला आहे.