खंडपीठ परिसरात वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:09+5:302021-02-05T04:18:09+5:30
पथदिवे बंद; मनपाचे दुर्लक्ष औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर परिसरातील अनेक वॉर्डांतील अंतर्गत पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक मनपाकडे तक्रार ...

खंडपीठ परिसरात वाहतुकीची कोंडी
पथदिवे बंद; मनपाचे दुर्लक्ष
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर परिसरातील अनेक वॉर्डांतील अंतर्गत पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक मनपाकडे तक्रार करीत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी पथदिव्यांसाठी तक्रारी केल्या तर तेदेखील दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
अग्रसेन चौक ते एन-५ रस्ता डांबरीकरणातून
औरंगाबाद : जालना रोडवरील अग्रसेन चौक ते एन-५ कडे जाणारा रस्ता पूर्णंत: खराब झाल्यामुळे डांबरीकरणातून त्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकातर्फा वाहतुक सुरू आहे.
सिमेंटच्या रस्त्यावरील ढापा फुटला
औरंगाबाद : कामगार चौकाकडून एन-४ कडे येणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावरील मेनहोलचा ढापा फुटला आहे. वाहनचालकांना ढापा फुटल्याचे दिसत नाही. त्यामुळे लहान-मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्यानांच्या स्वच्छतेला येईना गती
औरंगाबाद : महापालिकेची उद्याने लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याने अनेक ठिकाणी गवत वाढले असून, कचरा साचला आहे. त्यामुळे उद्यानांसह खुल्या जागांची स्वच्छता ठेवा, असे आदेश पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेल्या महिन्यात दिले होते. अद्याप उद्यानांची सफाई झाली नसल्याची ओरड नागरिक करीत आहेत.