वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:59 IST2017-08-21T00:59:30+5:302017-08-21T00:59:30+5:30
मंठा शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे.

वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : मंठा शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. तासन्तास कोंडी सुटत नसल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
शाळेचे मुले, मुलीही सापडेल तो मार्ग काढत जोखीम घेत या रस्त्यावरून चालत असतात. वाहतूक सुरळीत करताना पोलसांच्याही नाकी दम येतो.
आठवडी बाजाराच्या रस्त्यातच नाली बांधकामासाठी खड्डे खोदल्याने अडचण झाली आहे. मंठा शहरात वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. त्यात मुख्य रस्त्यावर नालीचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी हा बंद केलेला रस्ता सुरू ठेवायला पाहिजे होता. त्यामुळेच वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पो.नि. रफिक शेख यांनी सांगितले.