उसाचा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:39 IST2017-11-17T23:39:50+5:302017-11-17T23:39:58+5:30
पाथरी महामार्गावर उसाचा ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतुक दोन तास विस्कळीत झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़

उसाचा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पाथरी महामार्गावर उसाचा ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतुक दोन तास विस्कळीत झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़
पाथरी रस्त्यावरील जुन्या एआरटीओ कार्यालय परिसरात मुख्य रस्त्यावरच १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक उसाचा ट्रक उलटला़ ट्रक उलटल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती़ त्यामुळे दोन्ही बाजूंनी काही कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री ९.१५ वाजेपर्यंत या रांगा कायम होत्या. त्यामुळे तब्बल ६ ते ७ तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लगाला.