शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक कोंडी फुटणार; डझनभर उड्डाणपुल, दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:00 IST

२ महिने अभ्यास करुन पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते विकासाबद्दल गुरुवारी ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात शहरात नव्याने बारा उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग तयार करणे गरजेचे आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची शिफारस करण्यात आली आहे. रस्ते विकासाच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला जाणार आहे.

विकास योजनेनुसार रस्ता रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने प्रमुख ५ रस्त्यांवर पाडापाडी केली . त्यात पडेगाव - मिटमिटा रस्ता, पैठण रस्ता, महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा बीड बायपास रस्ता, जालना रोड, जळगाव रोड या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. त्यानंतर पालिकेने पेडेको या एजन्सीची नियुक्ती केली. या एजन्सीने २ महिन्यांपासून अभ्यास करुन प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला.

‘पेडेको’ चे प्रतिनिधी विजय पवार यांनी केलेल्या सादरीकरणानुसार महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपूल करणे गरजेचे आहे. नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट या ८ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सैन्यदलाच्या कार्यालयासाठी भुयारी मार्गाची शिफारस करण्यात आली.

जालना रोडवर ३ उड्डाणपूलजालना रोडवर सध्या ४ ठिकाणी उड्डाणपूल आहेत. त्यात आणखी ३ उड्डाणपुलांची शिफारस पेडेकोने केली आहे. यात हायकोर्टच्या सिग्नलजवळ, मुकुंदवाडी चौक आणि धूत हॉस्पिटल ते सुखना नदीचा पूल या ३ ठिकाणी उड्डाणपूल उभारावे, असे नमूद केले.

बीड बायपासवर आणखी ३ पूलबीड बायपास रस्त्यावर सध्या ३ ठिकाणी उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. त्यासोबतच आणखी ३ ठिकाणी पेडेकोने उड्डाणपूल उभारण्याबाबत शिफारस केली आहे.

जळगाव रोडवर ३ पूलजळगाव रोडवर गरवारे कंपनी, डॉ. आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक या ३ ठिकाणी उड्डाणपूल करण्याची शिफारस पेडेकोने केली आहे.

पैठण रोडवर डबलडेकर पूलपैठण रोडवर सध्या अस्तित्वात असलेला रेल्वेस्टेशनचा उड्डाणपुल महानुभाव आश्रमपर्यंत वाढविण्यात यावा. तर नक्षत्रवाडी ते बिडकीनदरम्यान डबल डेकर उड्डाणपूल तयार करावा.

नगरनाका ते पडेगाव उड्डाणपूल असावा ६ लेनचामहावीर चौक ते पडेगावदरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची तर नगरनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सैन्य दलाचे मैदान, कार्यालय, कॅन्टीनसाठी भुयारी मार्ग टाकण्याची शिफारस केली आहे. शिवाय, नगरनाका ते पडेगाव हा उड्डाणपूल ६ लेनचा असावा, असेही नमूद केले.

२ महिनेअभ्यास करुन पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar to Ease Traffic with Flyovers and Underpasses

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar plans to build a dozen flyovers and two underpasses to ease traffic. Key projects include a double-decker flyover between Mahavir Chowk and Padegaon, and an underpass for the military area near Nagarnaka. The detailed project report will soon be submitted to the government.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका