हर्सूल परिसरात कलगी-तुरा रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:43 IST2017-07-28T00:43:53+5:302017-07-28T00:43:53+5:30

नागपंचमीनिमित्त गुरुवारी हर्सूलच्या हनुमान मंदिरात आयोजित ‘कलगी-तुरा’ स्पर्धेत ‘हनुमान मकरध्वज कुस्ती’ या कलगीवर चार पार्ट्यांची शाब्दिक झुंज अखेर सायंकाळी बरोबरीत सुटली.

Traditional Kalgitura in Harsul temple | हर्सूल परिसरात कलगी-तुरा रंगला

हर्सूल परिसरात कलगी-तुरा रंगला

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परंपरेने ग्रामीण मातीत रुजलेला सांस्कृतिक वारसा तंत्रयुगात जोपासण्याचे काम हर्सूल गावकरी करीत आहे. हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे नागपंचमीनिमित्त गुरुवारी हर्सूलच्या हनुमान मंदिरात आयोजित ‘कलगी-तुरा’ स्पर्धेत ‘हनुमान मकरध्वज कुस्ती’ या कलगीवर चार पार्ट्यांची शाब्दिक झुंज अखेर सायंकाळी बरोबरीत सुटली.
कलगी-तुरा स्पर्धेत हर्सूल, चिमणपीरवाडी, गोलवाडी येथील चार पार्ट्यांनी कलगी व तुरा सादर करून एकमेकांना गायनातून उत्तर दिले. सकाळी ११ वाजेला सुरू झालेल्या या स्पर्धेने रिमझिम पावसातही ‘टाळ व ढोलकी’च्या ठेक्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.‘भीम जरासन कुस्ती’चा तुरा सादर करीत, चारही पार्ट्यांनी बरोबरीत आपली शाब्दिक ताकद कायम ठेवली. कलावंतांच्या हजरजवाबी कवनातून पार्ट्यांच्या शाब्दिक भांडाराला उपस्थित प्रेक्षक व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कटकडाटातून दाद दिली.
युवक मोबाइल चित्रणात दंग...
हर्सूल येथे परंपरेनुसार अनेक वर्षांपासून सातत्याने दरवर्षी ‘कलगी-तुरा’चे आयोजन केले जाते. या शाब्दिक युद्धाचे चित्रीकरण अनेक युवक आपल्या मोबाइलमध्ये करताना दिसत होते. यावेळी टेकचंद वाणी पहेलवान, चंदूलाल समालपुरे, गंगारामअप्पा, हिरामण गुंजाळे, गोविंद राठोड आदींच्या कलगी-तुºयाच्या पार्ट्या होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक पूनम बमणे, शेख लाल पटेल, बाबूलाल गुंजाळे, फकीरचंद हरणे, रूपचंद गुंजाळे, प्रल्हाद गुंजाळे, माधव वाणी, हरिदास हरणे, रंगनाथ गुंजाळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Traditional Kalgitura in Harsul temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.