पारंपरिक वेशभूषेत धनगर समाजाचा मोर्चा

By Admin | Updated: August 8, 2014 00:30 IST2014-08-07T23:56:40+5:302014-08-08T00:30:21+5:30

निलंगा : अनुसूचित जमातीचे आरक्षण व सवलती तात्काळ देण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर, बंडगर, हटकर समाजातील नागरिकांनी गु

Traditional costumes Dhangar community front | पारंपरिक वेशभूषेत धनगर समाजाचा मोर्चा

पारंपरिक वेशभूषेत धनगर समाजाचा मोर्चा



निलंगा : अनुसूचित जमातीचे आरक्षण व सवलती तात्काळ देण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर, बंडगर, हटकर समाजातील नागरिकांनी गुरुवारी काठी- घोंगड्याची पारंपरिक वेशभूषा परिधान करुन येळकोट- येळकोट जय मल्हार असा जयघोष करण्याबरोबरच भंडाऱ्याची उधळण करीत येथील तहसीलवर मोर्चा काढला़
या मोर्चात धनगर समाज मोर्चा कमेटीचे अध्यक्ष शिवाजी अंचूळे, मोर्चा समितीचे युवा अध्यक्ष रामेश्वर होळकर, पंचायत समिती सदस्य मुरलीधर अंचूळे, बालाजी गजभार, झटिंग म्हेत्रे, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी चेंडकापूरे, अण्णाराव पाटील, माधव शिंगाडे, तुकाराम काळे, संजय भोसले, देवबा काळे महाराज, राजेंद्र सूर्यवंशी, व्यकंट सूर्यवंशी, बाळासाहेब शिंगाडे, सुभाष म्हेत्रे, श्रीरंग शेवाळे, गोविंद शिंगाडे, डॉ़ गिरीधर सूर्यवंशी, डॉ़ रूपेश काळे, डॉ़ रूपनर, विठ्ठल बारतोंडे, लक्ष्मण होळकर यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या़ माजी आमदारसंभाजीराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे अविनाश रेशमे यांनी मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला़ यावेळी तहसीलदार एऩ डी़ टिळेकर यांना धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले़ या मोर्चास शिवाजी चौकातून प्रारंभ झाला़ हा मोर्चा संभाजी चौक मार्गे तहसीलवर धडकला़(वार्ताहर)

Web Title: Traditional costumes Dhangar community front