मताधिक्याची परंपरा कायम नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर
By Admin | Updated: May 18, 2014 00:51 IST2014-05-18T00:40:18+5:302014-05-18T00:51:10+5:30
भोकरदन विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मताधिक्य देण्याची परंपरा कायम ठेवली.

मताधिक्याची परंपरा कायम नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर
भोकरदन विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मताधिक्य देण्याची परंपरा कायम ठेवली. जालना लोकसभा निवडणुकीत भोकरदन विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा भोकरदन तालुक्याचे भूमिपूत्र खा़ रावसाहेब दानवे यांना ९९ हजार ९८५ मते मिळाली तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना ७१ हजार ७४७ मते मिळाली. खा़ रावसाहेब दानवे यांना या मतदार संघातून २८ हजार २३८ मतांचे मताधिक्य मिळाले. इतर मतदारसंघाच्या तुलनेत सर्वात कमी मताधिक्य हे भोकरदन मतदार संघातून असले तरी या तालुक्यातील बदनापूर मतदारसंघात गेलेल्या ६५ गावातून दानवे यांना एकतर्फी मतदान झाल्याचे चित्र समोर आले. या निवडणुकीत खा़ दानवे यांनी भोकरदन मतदार संघात जास्त लक्ष दिले नाही त्याउलट फुलंब्री, पैठण, सिल्लोड, जालना, बदनापूर या मतदारसंघावर भर दिला. भोकरदन मतदार संघात प्रचाराची धुरा ही रामेश्वरचे चेअरमन तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाटील दानवे़, निर्मलाताई दानवे, कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव थोटे, वर्षाताई देशमुख, शीतलताई गव्हाड, अरूण वाघ, लक्ष्मण मळेकर, कौतीकराव जगताप,गणेशबापू फुके, रमेश गव्हाड, राजेद्र देशमुख, गणेशराव रोकडे,प्रकाश गव्हाड, शालिकराम म्हस्के, विजयसिह परिहार, देवीदास देशमुख, संतोष लोखडे, भगवान लहाने,कैलास पुंगळे, समाधान शेरकर, अनिल गांवडे, राहुल ठाकूर, कैलास गव्हाड, गणेश वराडे, कमलाकर सांबळे, विजय कड, पंढरीनाथ खरात, सुरेश शर्मा, भाऊसाहेब काकडे, रामलाल चव्हाण, रमेश मुरकुटे, गोविदराव पंडीत, मधुकर गाढे, सुरेश दिवटे, भानदास सरोदे, बालाजी आवटी, राजकुमार राजपूत, शिवाजी पुंगळे, तुकाराम जाधव, माधवराव हिवाळे, रोहिणी हिवाळे, बालासाहेब करतारे, दादाराव राऊत, नवनाथ दौड, भगवान खाकरे, नाना भागिले, मधुकर दानवे, गणेश ठाले, रामेश्वर सोनुने, भगवान सोनुने, शौकत अली, शोभाताई मतकर, ज्ञानेश्वर पुंगळे, आशाताई माळी, रमेश पांडे, सुरेखा दांडगे, मदन कुलवाल, रमेश मोकासे, राजेश जोशी, डॉ कुळकर्णी,श्रावण प्रशाद, जयेश प्रशाद, भूषण शमा आदींनी परिश्रम घेतले. संपूर्ण देशात मोदी लाट होती. या लाटेचा मोठा फायदा रावसाहेब दानवे यांना झाला. मोदी लाटेपुढे विकास कामांचा मुद्दाही गौण ठरल्याचे चित्र आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघात खा. दानवे यांनी विकास कामे केली. या विकास कामांची पावती मताधिक्यातून मिळाली. इतर ठिकाणी मात्र लाटच तारक ठरली. सर्व निवडणुकीत भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपालाच मताधिक्य मिळाल्याचा इतिहास आहे. त्याचे कारण की यापैकी नऊ निवडणुकीत भोकरदन तालुक्याचा उमेदवार म्हणून मतदारांनी या उमेदवारांना मतदान केले. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र अनेकदा भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता या मतदारसंघातील मतदारांनी आणली आहे. देशात नरेंद्र मोदी यांची मोठी त्सुनामी लाट होती. यामुळे देशात मोठे सत्तांतर झाले. या सत्तांतराचा फटका काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. भोकरदन विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे चंद्रकांत दानवे हे तीन टर्मपासून आमदार आहेत. महायुतीचे वाढलेले मताधिक्य आ. दानवे यांना धोक्याची घंटा ठरु शकते.