पंचपीठाची परंपरा कायम राहणार
By Admin | Updated: August 31, 2014 01:10 IST2014-08-31T00:54:08+5:302014-08-31T01:10:18+5:30
उदगीर : पंचपीठे ही वीरशैव धर्माचे संस्थापक असून सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ आहे़ कितीही संकटे आली तरी आम्ही धर्मपरंपरेचे पाईक असून पंचपीठाची धर्मपरंपरा यापुढेही नि:संदिग्धपणे कायम राखू,

पंचपीठाची परंपरा कायम राहणार
उदगीर : पंचपीठे ही वीरशैव धर्माचे संस्थापक असून सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ आहे़ कितीही संकटे आली तरी आम्ही धर्मपरंपरेचे पाईक असून पंचपीठाची धर्मपरंपरा यापुढेही नि:संदिग्धपणे कायम राखू, अशी ग्वाही जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी गुरुवारी येथे दिली़
उदगीरच्या राजराजेश्वरी देवी मंदिरात महिनाभरापासून श्रावणमास अनुष्ठान सोहळा सुरु होता़ त्याचा समारोप बुधवारी करण्यात आला़ यावेळी डॉ़शिवलिंग शिवाचार्य महाराज, मठाधीश शंभुलिंग शिवाचार्य महाराज, सिद्धलिंग शिवाचार्य, शिवमुर्ती शिवाचार्य, बसवलिंग स्वामी, निलकंठलिंग शिवाचार्य, गुरुलिंग शिवाचार्य, गुरुपादप्पा स्वामी, रेवणसिद्ध शिवाचार्य, रुद्रपशुपती, गुरुमूर्ती शिवाचार्य, कनकट्टे महाराज, राजेश्वर शिवाचार्य या पीठाधीशांसह आ़शंकरअण्णा धोंडगे, ओमप्रकाश पोकर्णा, डॉ़सुधाकर भालेराव, वसंतराव चव्हाण, माजी खा़ गंगाधर कुंटूरकर व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व रामेश्वर निटुरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले़ अनुष्ठान सोहळ्यादरम्यान गणपतराव कदम गुरुजी यांचे शिखामणी ग्रंथावर प्रवचन झाले होते़ त्यावर आधारित घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या भाविकांना जगद्गुरुंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले़ सूत्रसंचालन प्रा़मल्लेश झुंगा स्वामी यांनी केले़ कार्यक्रमास उदगीरसह नांदेड, बीदर, उस्मानाबाद, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील भाविक उपस्थित होते़ (वार्ताहर)
यावेळी जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य यांनी अनुष्ठान हे मानवजातीच्या कल्याणासाठीच असल्याचे सांगून जीवनात सुख, शांती व समृद्धतता नांदावी, अशी अपेक्षा व्यक्त केली़ डॉ़शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी अनुष्ठानाचे महत्व विषद करुन मानवी जीवनातील आचरणाविषयी उपदेश केले़ तसेच समाजाला एकत्रित बांधण्याचा दुआ जगद्गुरु असून, पाचही जगद्गुरुंनी एकत्र येऊन मानवी कल्याणासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले़