संपूर्ण लॉकडाऊन असेल तरच व्यापारी पाठिंबा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:05 IST2021-04-11T04:05:02+5:302021-04-11T04:05:02+5:30
त्यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र चेंबरची ऑनलाईन बैठक झाली. यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावरही चिंता व्यक्त करण्यात ...

संपूर्ण लॉकडाऊन असेल तरच व्यापारी पाठिंबा देणार
त्यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र चेंबरची ऑनलाईन बैठक झाली. यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावरही चिंता व्यक्त करण्यात आली. सरकार जर लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत असेल तर त्यांनी संपूर्ण लॉकडाऊन करावे. जर अत्यावश्यकच्या नावाखाली काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली तर त्या लॉकडाऊनचा काही परिणाम होणार नाही, असेही नमूद करण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन सेवेचाही समावेश करण्यात यावा. मोठ्या कंपन्या यांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली आहे.
चौकट
व्यापारी महासंघाची आज ऑनलाईन बैठक
जिल्हा व्यापारी महासंघ रविवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन बैठक घेणार आहे. यात महासंघाचे पदाधिकारी व ७२ संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.