कारवाईच्या इशाऱ्यानंतर व्यापाऱ्यांनी केली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:05 IST2021-04-28T04:05:12+5:302021-04-28T04:05:12+5:30
वाळूज महानगर : कोविड चाचणीशिवाय दुकाने उघडल्यास कारवाईचा इशारा देताच, वाळूजला व्यापार्यांनी कोविड चाचणीसाठी गर्दी केली. मंगळवारी १५० व्यापाऱ्यांची ...

कारवाईच्या इशाऱ्यानंतर व्यापाऱ्यांनी केली कोरोना चाचणी
वाळूज महानगर : कोविड चाचणीशिवाय दुकाने उघडल्यास कारवाईचा इशारा देताच, वाळूजला व्यापार्यांनी कोविड चाचणीसाठी गर्दी केली. मंगळवारी १५० व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यात २ जण पॉझिटिव्ह मिळून आले.
वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी, यासाठी जनजागृती मोहीम राबविली होती. मात्र, व्यापाऱ्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी विना चाचणी दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. पोलिसांच्या या तंबीमुळे व्यापारी कोरोना चाचणीसाठी तयार झाले. मंगळवारी वाळूजच्या रामराई टी-पॉइंटवर आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चाचणीसाठी शिबिराचे आयोजन केले होते. यात गावातील १५० व्यापाऱ्यांची अँटिजन चाचणी घेण्यात आली. यात २ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहे. कोरोना चाचणीसाठी उपनिरीक्षक मनिषा केदार, वाहतुक शाखेचे पी.ई.साबळे, एस.बी. राऊत, श्याम जगताप, पूनम पारधी, आरोग्यसेवक सुनील म्हस्के, आरोग्यसेविका प्रीती कांबळे, निकिता भालेराव आदींनी प्रयत्न केले.
फोटो ओळ
वाळूजला पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली.