भूम येथे व्यापार्यांचा बंद
By Admin | Updated: May 29, 2014 00:29 IST2014-05-29T00:17:26+5:302014-05-29T00:29:01+5:30
भूम : शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.

भूम येथे व्यापार्यांचा बंद
भूम : शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही मोहीम तात्काळ बंद करावी, यासाठी येथील व्यापारी संघटनेने बुधवारी संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवली. त्यानंतर सदरील मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले. भूम शहरातील गोलाई चौक, बार्शी रोड आदी ठिकाणचे अतिक्रमण काढल्याने या परिसरातील व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश व्यापार्यांचे दुकानेही अतिक्रमणात गेल्याने व्यापरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम बंद करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. येथील व्यापर्यांनी बुधवारी शहरामधील सर्व दुकाने बंद ठेवली होती. शहरातील बाजारपेठ दिवसभर शुकशुकाट दिसून आला. (वार्ताहर)