समान व्यापार धोरणासाठी व्यापाऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:29+5:302020-12-17T04:32:29+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ‘रिटेल डेमोक्रोसी डे’ अभियानांतर्गत देशातील किरकोळ व्यापारी व ऑनलाइन व्यापार यांच्यात भेदभाव न करता समान ...

समान व्यापार धोरणासाठी व्यापाऱ्यांचे निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, ‘रिटेल डेमोक्रोसी डे’ अभियानांतर्गत देशातील किरकोळ व्यापारी व ऑनलाइन व्यापार यांच्यात भेदभाव न करता समान व्यापार धोरण तयार करण्यात यावे. सर्वांसाठी समान कायदा असावा, अशी मागणी देशातील व्यापारी संघटनांतर्फे केली जात आहे. ई-कॉमर्स कंपन्या कोणतेही नियम न पाळता, कर न भरता कोट्यवधीचा व्यवसाय करीत आहेत. या उलट देशातील किरकोळ व्यापारी सर्व सरकारी नियम पाळून, कर भरून आपला व्यवसाय करीत आहेत. यामुळे ई- कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करणे अवघड झाले आहे. ई- कॉमर्स व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी समान धोरण तयार करावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेंडर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शाह, व्यापारी महासंघाचे संजय कांकरिया, देवेंद्र सेठ, गोपाल पटेल, गुलाम हक्कानी, राकेश सोनी, सरदार हरिसिंग, जयंत देवळणकार, कचरू वेळूजकर यांची उपस्थिती होती.