टायर फुटल्याने ट्रॉलीसह टॅक्टर पुलावरून कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:12+5:302021-02-06T04:07:12+5:30
वाळूज महानगर : ऊसतोड मुजरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलाखाली कोसळून सात मजूर गंभीर जखमी झाल्याची ...

टायर फुटल्याने ट्रॉलीसह टॅक्टर पुलावरून कोसळले
वाळूज महानगर : ऊसतोड मुजरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलाखाली कोसळून सात मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लांझीजवळ घडली. या अपघातात पाच लहान मुले जखमी झाले आहेत.
मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचे कुटुंबीय लांझी शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून घरी जात होते. वाळूज-ब्रह्मगव्हाण या एमआयडीसीच्या रस्त्यावरून वस्तीकडे येत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लांझीलगतच्या खामनदी पुलावरटायर फुटल्याने चालक प्रभाकर शरणागत याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॉलीसह टॅक्टर खामनदीच्या पुलावरून जवळपास ३० फुट खाली कोसळले. मात्र, पुलाच्या फटीमध्ये ट्रॉली अडकल्याने प्रसंगावधान राखत मुजरांनी दोघा-तिघांना बाहेर फेकले. काही वेळातच टॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात कोसळल्याने चालकसह ट्रॅक्टरमधील ऊसतोड खाली पडून गंभीर जखमी झाले. नारायणपूरचे माजी सरपंच नासेर पटेल, वजीर पटेल, उपनिरीक्षक लक्षमण उंबरे, पोहेकॉ. पांडूरंग शेळके आदींनी जखमींना मदत केली. यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी मजुरांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींमध्ये यांचा समावेश
या अपघातातील जखमी ऊसतोड मजूर हे पैठण तालुक्यातील वरुडी येथील रहिवासी असून, मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. या अपघातात अर्चना शिवनाथ शरणागत (२५), प्रभाकर शरणागते (२६), शिवनाथ शरणागते (३०), मीना शरणागते (३०), साहिल शराणगते (५), स्वराज शरणागते (४), कल्याणी प्रभाकर शरणागते (५), कानफिनाथ शरागते (५), सुहानी संदीप घोरपडे (१५) आदी नऊ जण गंभीर जखमी झाले आहे.
फोटो ओळ
वाळूज-ब्रहम्मगव्हाण रस्त्यावरील लांझीलगत खामनदीवरील पुलावरून ट्रॉलीसह ट्रॅक्टरखाली कोसळल्याने नऊ ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले.