सोयगाव शहर कडकडीत बंद
By Admin | Updated: June 19, 2017 00:39 IST2017-06-19T00:32:51+5:302017-06-19T00:39:37+5:30
सोयगाव : हिंदू देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आ. अब्दुल सत्तार यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने रविवारी सोयगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

सोयगाव शहर कडकडीत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : हिंदू देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आ. अब्दुल सत्तार यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने रविवारी सोयगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढली व घोषणाबाजी करून शिवाजी चौकात सभा घेतली. आ. सत्तार यांना अटक न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर ,सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, इद्रीस मुलतानी, सोयगाव तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य पुष्पाबाई काळे, नगराध्यक्ष कैलास काळे, भाजप शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंगेश सोहनी, शांताराम देसाई, वसंत बनकर, बाळू झवर, रऊफ देशमुख, योगेश मानकर, संजय मोरे, मोतीलाल वाघ, सीताराम पाटील, बंडू काळे,युवराज वामने आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.