दौरे पुरे झाले, प्रत्यक्ष मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:47 PM2018-10-27T18:47:16+5:302018-10-27T18:47:42+5:30
शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.
श्रीकांत पोफळे / शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.
२७ आॅक्टोबर सकाळी ८ वाजता सटाणा येथे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत पीक पाहणीसाठी उपस्थित होते. उपसरपंच नारायण घावटे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव घावटे, ज्ञानेश्वर घावटे, गणेश घावटे, योगेश घावटे आदींची पालकमंत्र्यांनी भेट घेतली. औरंगाबाद तालुका दुष्काळग्रस्त असल्याने अनुदान जाहीर करून तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, सध्या चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने चारा छावणी सुरू कराव्यात, शिवाय फळबागा वाचवण्यासाठी काय करता येईल त्यादृष्टीने सुद्धा कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी केली.
तालुक्यावर भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणे आटली खरिपाचे पिके वाया गेली. या उत्पन्नातून पिकावर झालेला खर्च निघाला नाही. शिवाय खरिपाच्या पिकातून मका व बाजरी यातून चारा निघाला. मात्र हा चारा केवळ महिनाभर पुरेल. शिवाय पाणीटंचाई भीषण उग्ररुप धारण करत आहे. पालकमंत्री दिपक सावंत यांनी अनेक शिवारात जाऊन कापूस, तुर या पिकांची पाहणी केली.
यावेळी माजी आ. डॉ. कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, प.स.सभापती ताराबाई उकीर्डे, एस.डी.एम ज्ञानोबा बाणापुरे, तहसिलदार सतिष सोनी, कैलास उकर्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक शिंदे, विठ्ठल कोरडे, डॉ.भगवान शिंदे, संपत वाघ आदिंची उपस्थिती होती, शिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी सुद्धा सकाळी दोन गावांत उपस्थित होते.
पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार
आपण शेतकाºयांच्या बाजूने असून, बांधावर जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणे मांडणार आहे. पाहणी अहवाल सादर केल्यानंतर मदत जाहीर होईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.