शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पर्यटकांनीच फिरवली पाठ; पर्यटनस्थळांवरील शुकशुकाटाने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 3:32 PM

Ajantha - Ellora Caves : मागील तीन महिन्यांत पर्यटकांअभावी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मंडळींच्या रोजी-रोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे.

ठळक मुद्देदरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबादेत येत

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद( Tourism in Aurangabad ) होती. शासनादेशानुसार जूनपासून ती खुली करण्यात आली. मात्र, पर्यटकांनीच पाठ फिरवली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबादेत येत असत. मागील तीन महिन्यांत पर्यटकांअभावी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मंडळींच्या रोजी-रोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणताही पुढाकार घेतला जात नाही. ( The tourists turned their backs; low tourist response on tourist destinations has made the livelihood of many difficult) 

वेरूळ लेणी१७ जूनपासून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असलेल्या लेण्या बघण्यासाठी दररोज ६०० ते ७०० पर्यटकच येतात. शनिवार आणि रविवारी लेणी बंद असते. ही बाब असंख्य पर्यटकांना माहीत नाही. त्यामुळे लेणी बंद असल्याचे पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. मागील चार महिन्यांत किमान ८५ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. यातून पर्यटन विभागाला ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

हेही वाचा - आता शहरातील नाल्यांवर व्हर्टीकल गार्डन; हवेची गुणवत्ता राखण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग

अजिंठा लेणी२७ जुलैपासून अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या. या लेणीतील चित्रकृती जगभरातील पर्यटकांना माेहिनी घालतात. कोरोनाच्या संसर्गानंतर चार महिन्यांत १७ हजार ७०० पर्यटकांनी या लेणीला भेट दिली, त्यातून सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनिवार, रविवारी ही लेण्याही बंद ठेवण्यात येते.

बीबी का मकबराजिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार १७ जूनपासून मकबरा खुला करण्यात आला. दोन शिफ्टमध्ये पर्यटकांना आत सोडावे असे आदेश आहेत. त्यामुळे पर्यटन विभाग सकाळी ५०० आणि सायंकाळी ५०० पर्यटकांनाच तिकीट वाटप करीत आहे. त्यामुळे दररोज ८०० ते १००० पर्यटकच मकबरा पाहू शकतात. महिन्याला किमान २७ ते ३० हजार पर्यटक येतात. चार महिन्यांत ९० हजार पर्यटकांना मकबरा पाहिला.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा