पर्यटकांनीच फिरवली पाठ; पर्यटनस्थळांवरील शुकशुकाटाने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 03:32 PM2021-09-27T15:32:35+5:302021-09-27T15:35:11+5:30

Ajantha - Ellora Caves : मागील तीन महिन्यांत पर्यटकांअभावी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मंडळींच्या रोजी-रोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे.

The tourists turned their backs; low tourist response on tourist destinations has made the livelihood of many difficult | पर्यटकांनीच फिरवली पाठ; पर्यटनस्थळांवरील शुकशुकाटाने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट

पर्यटकांनीच फिरवली पाठ; पर्यटनस्थळांवरील शुकशुकाटाने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट

googlenewsNext
ठळक मुद्देदरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबादेत येत

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद( Tourism in Aurangabad ) होती. शासनादेशानुसार जूनपासून ती खुली करण्यात आली. मात्र, पर्यटकांनीच पाठ फिरवली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबादेत येत असत. मागील तीन महिन्यांत पर्यटकांअभावी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मंडळींच्या रोजी-रोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणताही पुढाकार घेतला जात नाही. ( The tourists turned their backs; low tourist response on tourist destinations has made the livelihood of many difficult) 

वेरूळ लेणी
१७ जूनपासून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असलेल्या लेण्या बघण्यासाठी दररोज ६०० ते ७०० पर्यटकच येतात. शनिवार आणि रविवारी लेणी बंद असते. ही बाब असंख्य पर्यटकांना माहीत नाही. त्यामुळे लेणी बंद असल्याचे पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. मागील चार महिन्यांत किमान ८५ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. यातून पर्यटन विभागाला ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

हेही वाचा - आता शहरातील नाल्यांवर व्हर्टीकल गार्डन; हवेची गुणवत्ता राखण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग

अजिंठा लेणी
२७ जुलैपासून अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या. या लेणीतील चित्रकृती जगभरातील पर्यटकांना माेहिनी घालतात. कोरोनाच्या संसर्गानंतर चार महिन्यांत १७ हजार ७०० पर्यटकांनी या लेणीला भेट दिली, त्यातून सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनिवार, रविवारी ही लेण्याही बंद ठेवण्यात येते.

बीबी का मकबरा
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार १७ जूनपासून मकबरा खुला करण्यात आला. दोन शिफ्टमध्ये पर्यटकांना आत सोडावे असे आदेश आहेत. त्यामुळे पर्यटन विभाग सकाळी ५०० आणि सायंकाळी ५०० पर्यटकांनाच तिकीट वाटप करीत आहे. त्यामुळे दररोज ८०० ते १००० पर्यटकच मकबरा पाहू शकतात. महिन्याला किमान २७ ते ३० हजार पर्यटक येतात. चार महिन्यांत ९० हजार पर्यटकांना मकबरा पाहिला.

Web Title: The tourists turned their backs; low tourist response on tourist destinations has made the livelihood of many difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.