शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पर्यटनस्थळे अनलॉक झाली तरी धार्मिक स्थळे लॉकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 7:07 PM

tourism परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर कोरोना नियंत्रणासाठी लागू सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी चव्हाण यांचा निर्णय १७ जूनपासून मुक्तपणे पर्यटन करा 

औरंगाबाद : जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ लेण्यांसह औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा व इतर तिकिटांवर प्रवेश असलेली पर्यटनस्थळे १७ जूनपासून सकाळी ६ वाजेपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी जाहीर केला. पर्यटन स्थळे अनलाॅक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी धार्मिक स्थळे मात्र लॉकच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर कोरोना नियंत्रणासाठी लागू सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे बंद करण्यात आली होती. जून महिन्यात ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याचा कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर निश्चित केलेल्या पाच स्तरामंध्ये औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना निर्बंध काही प्रमाणात कायम राहिले तर शहरात सर्व काही खुले करण्यात आले. ७ जूनपासून सर्व काही अनलॉक झाले. मात्र, पर्यटनस्थळे बंद होती. दोन दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाने जिल्हाधिकारी चव्हाण यांना पत्रव्यवहार करून पर्यटनस्थळे खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी दिवसभर सर्व यंत्रणांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारपासून पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांचे आदेश असेजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर सकाळी आणि दुपारच्या सत्रात केवळ एकेक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. सर्व ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळावे लागतील. सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद असतील. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असेल. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद