औरंगाबादेतील पर्यटन स्थळे सुरक्षित असावीत!
By Admin | Updated: August 25, 2014 00:23 IST2014-08-25T00:21:17+5:302014-08-25T00:23:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत,

औरंगाबादेतील पर्यटन स्थळे सुरक्षित असावीत!
औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत, वाहनातून उतरताच जपानी भाषा बोलत विविध सामान खरेदी करण्याचा आग्रह धरणारे व्यापारी, रेल्वेस्टेशनवर उतरताच भिकाऱ्यांचा गराडा पाहून आश्चर्य वाटते. ही परिस्थिती बदलायला हवी. जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ आमच्या देशात असते तर आम्ही खूप उत्साहाने त्याची जपणूक केली असती, असे मत जपानी नागरिकांच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. भारत- जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट २०१२ मध्ये शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग ईव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जपानहून खास सात स्वच्छता दूत शहरात दाखल झाले आहेत. उद्या आणखी दोन जण येणार आहेत. यामध्ये तोषिओ चिगुसा, सासाकी जिनसुके, एबीस्यू ताकाफुमी, आकितो साकाई, नाकामोतो युकारी, सावादा इत्सुकी, सुरुगा मेगुमी यांचा समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते पुढे म्हणाले की, जपानमध्ये आम्ही वेगवेगळ्या संघटनांसोबत स्वच्छतेचे काम करीत आहोत. सुरुवातीला आमच्याकडेही अशीच अवस्था होती; पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. औरंगाबादही स्वच्छ, सुंदर होईल. 1औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहायला आम्हाला आवडेल, बाजारपेठेत खरेदी-विक्रीचा व्यवहार कसा होतो, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.2शिष्टमंडळातील काही सदस्यांनी या शहरात एक ते दोन वर्षे राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण येथे कामाला खूप वाव आहे.3टपाल पेट्या स्वच्छ करण्याचा एका सदस्याला खूप छंद आहे. तो एका वाहनावर बसून शहरातील विविध टपालपेट्या साफ करणार आहे.4हीच पर्यटन स्थळे आमच्या देशात असती, तर कुठेच केरकचरा आढळला नसता. यापेक्षा आणखी कितीतरी जास्त सोयी- सुविधा दिसल्या असत्या.