शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन ठरले जीवघेणे! येलदरी धरणात पोहताना वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा पाण्यात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:07 IST

वडील आणि मुलगा धरणाच्या जलाशयात उतरले मात्र पोहता येत नसल्याने मुलगा बुडाला

सेनगाव ( हिंगोली ) : येलदरी धरणाच्या जलशयात शनिवारी बुडालेल्या १६ वर्षीय मुलाचा अखेर रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला. रोहन संजय कल्याणकर असे मृत मुलाचे नाव आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह  बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती सेनगाव पोलिसांनी दिली.

जिंतूर शहरातील नामदेव नगर येथील संजय कल्याणकर कुटुंब शनिवारी येलदरी धरण परिसरात ( ता. सेनगाव) पर्यटनासाठी आले होते. दरम्यान, वडील व रोहन हे धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने 16 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांनी पाण्यात रोहनचा शोध घेतला मात्र शनिवारी सायंकाळी त्याचा शोध लागला नाही. 

दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ग्रामस्थ आणि पोलिसांना जलाशयात खोलवर रोहनचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जिंतूर येथे मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुपडे, बीट जमादार कानबाराव थिटे राजेश जाधव, संदीप पवार, अमोल चिकने, भीमराव चिंतारे तसेच स्थानिक मासेमारी करणारे यांनी मदत कार्य केले. 

जलाशयाच्या खोलीचा अंदाज येत नाही जिंतूर-सेनगाव तालुक्याच्या हद्दीवर हिंगोली वन विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले वन उद्यान पाहण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, येलदरीचा विस्तीर्ण तलाव व पाण्याच्या खोलीचा अंदाज नवीन पर्यटकांना लवकर येत नाही. यातून दुर्घटना घडत आहेत.  प्रशासनाने याबाबत इशारा देणारे फलक लावून पर्यटकांना पाण्यात उतरण्यास मज्जाव करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीDamधरण